आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरबाजारात त्याने तिचा हात पकडला, असे काही म्हणाला की थेट पोहचला तुरुंगात...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-  वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून हॉटेलमध्ये येण्याचा अाग्रह धरणाऱ्या संशयिताविराेधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रास देण्याचा प्रकार सुरूच असल्याने पीडित मुलीने पोलिसांत धाव घेत शनिवारी (दि. २४) मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
 
मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, १६ मे रोजी सायंकाळी मुलीसोबत विनयनगर भाजी मार्केटमध्ये गेले असता संशयित रोशन बीरेंद्र बिके (रा. विनयनगर) याने मुलीचा हात पकडून ‘हॉटेलमध्ये चल, आली नाही तर मारून टाकेन’, असा दम दिला. संशयिताच्या दहशत भीतीपोटी त्यावेळी पोलिसांत तक्रार दिली नाही. त्यानंतरही संशयिताकडून मुलीला त्रास देण्याचे प्रकार सुरूच होते.
 
अखेर मुलीने हिंमत दाखवत पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी विनयभंग आणि लहान बालकांचे अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत संशयिताला अटक केली. 
 
बातम्या आणखी आहेत...