आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik MNC Put Dangor Sign Board's On Home Where Dengue's Mosquito Will Found

‘सावधान! हे डेंग्यूच्या एडिस डासांचे घर...’, नाशिक मनपा लावणार ४० हजार स्टीकर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्वच्छतेबाबत वारंवार जनजागृती करूनही शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता ज्या घरात डेंग्यू पसरवणा-या डासाच्या अळ्या सापडतील तेथे ‘सावधान! हे आहे एडिस डासाच्या उत्पत्तीचे ठिकाण..’ असे स्टीकर लावण्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने ठरवले आहे. तब्बल ४० हजार असे स्टीकर्स महापालिकेने तयार केली आहेत. स्वच्छतेबाबत
हलगर्जी करणा-या कुटुंबीयांना पुन्हा जागरूक करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

नाशिक शहरात आॅक्टाेबर महिन्यात डेंग्यूचे जवळपास शंभर रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांत तर या आजाराने तिघांचे बळी गेले आहेत. त्यामुळे वैद्यकीय व आराेग्य विभागावर टीकेची झाेड उठली. मात्र, अद्यापही हे दाेन्ही विभाग डेंग्यूच्या प्रसारासाठी लाेकांचा निष्काळजीपणाच कसा कारणीभूत आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. डेंग्यूचा प्रसार करणा-या एडिस डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात हाेत असल्यामुळे लाेकांनी काेरडा दिवस पाळावा, पाण्याची भांडी िनयमित स्वच्छ करावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले हाेते. मात्र, त्यानंतरही गृहभेटीत अनेक ठिकाणी स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्यामुळे पालिकेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

डाॅक्टरांवर कारवाई
डेंग्यूचे निदान करण्यासाठी खासगी डाॅक्टरांकडून रॅपिड वा स्क्रीनिंग टेस्ट केली जाते. त्यावर उपचार करताना खराेखरच डेंग्यूच आहे का याचे निदान करण्यासाठी रक्तनमुने िजल्हा रुग्णालयाला पाठवले जात नाहीत. अशा परिस्थितीत डेंग्यूचा एखादा रुग्ण दगावलाच तर त्याची माहिती पालिकेला मिळत नाही. मात्र, संबंधित डाॅक्टर ‘डेंग्यूमुळे मृत्यू’ असा दाखला देऊन माेकळा हाेताे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडे आजघडीला डेंग्यूमुळे किती मृत्यू झाले याची आकडेवारीच नसल्याचा दावा वैद्यकीय अधीक्षक डाॅ. बी.आर गायकवाड यांनी केला. डेंग्यूबाधित रुग्ण आढळला तर खासगी डाॅक्टरांनी तातडीने पालिकेला माहिती कळवायची, अशी सक्ती केली जाणार असून माहिती न कळवणा-या डाॅक्टरांवर कारवाई हाेणार असल्याचेही सांगण्यात आले.

दंडात्मक कारवाई
महापालिकेने नाशिकराेड विभागात १५००, सिडकाे विभागात १५००, तर नाशिक पूर्व विभागात २ हजार रुपयांचा दंड ठाेठावला आहे. सफाई कर्मचा-यांना गणवेशासहित हजर राहण्याचे आदेश िदले असून कारणे दाखवा नाेटीस दाखवल्यानंतर कर्मचारी वेळेत कामावर येत असल्याचा दावा आराेग्यधिका-यांकडून केला जात आहे.

मुंबईत अघाेरी उपाय
मुंबई महापालिकेने ज्या घरात डेंग्यूचे डास, अळ्या आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इतका कठाेर निर्णय घेतल्यास टीकेत आणखी भर पडेल म्हणून नाशिक पालिकेने अनाेखा फंडा लढवला आहे. वैद्यकीय विभागाला ज्या घरात डेंग्यूचा प्रसार करणा-या एडिस डासाच्या अळ्या सापडतील त्या घरावर ‘एडिस उत्पत्तीचे ठिकाण’ असे स्टीकर लावले जाणार आहे.