आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकचे लक्ष्य आता आयआयटी, जेईईकडे; केंद्र सरकारकडे मागणी करण्यासाठी संघटनांची आज बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इलेक्ट्रिकल हबमध्ये नाशिकच्या समावेशाची घोषणा झाल्यानंतर आता नाशिककरांचा फोकस आयआयटी आणि जेईई यांसारख्या नामांकित संस्थांचे
केंद्र शहरात सुरू व्हावे, यावर आहे. यासाठी शहरातील निमा, आयमा, सिटीझन फोरम, चेंबर आॅफ कॉमर्स, नाईस, निवेक यांसारख्या नामांकित संघटना एकत्र आल्या आहेत. सोमवारी (दि. 23) सायंकाळी सातपूर येथील नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या कार्यालयात याबाबत एक अनौपचारीक बैठक होत असून, त्यात केंद्र सरकारकडे यासाठी साकडे घालण्याबाबत मंथन केले जाणार आहे.

जगाच्या पाठीवर वेगाने विकसित होणार्‍या शहरांपैकी 16 व्या क्रमांकाचे शहर, तर देशपातळीवरील याच प्रकारचे चौथ्या क्रमांकाचे शहर म्हणून नाशिकचा लौकिक सातासमुद्रापार गेला आहे. शहरातील नामांकित इलेक्ट्रिकल कंपन्यांकडून स्विच गियर्स आणि ब्रेकर्सच्या देशातील एकूण उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन केले जाते. यामुळेच केंद्र शासनाकडून येथे तपासणी प्रयोगशाळा नियोजित केली गेली असून, या सुविधांच्या अनुषंगाने नव्याने देशात विकसित होणार्‍या इलेक्ट्रिकल हबमध्ये नाशिकचा समावेश केला गेला आहे. आता यापुढे जाऊन नाशिक एक उत्तम शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत असून, आयआयटी, जेईई यांपैकी एक तरी केंद्र येथे सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर दिशा : नवीन सत्तारूढ सरकारने राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून कामाची दिशा स्पष्ट केली आहे. त्यात कुशल मनुष्यबळ विकसित करण्याबरोबरच आयआयटी, जेईई यासारख्या संस्थांची संख्या वाढविण्यावर भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर हा ‘फोकस’ स्थानिक संघटनांनी निश्चित केला आहे.

स्मृती इराणींना भेटण्याची तयारी :
केंद्रीय मनुष्यबळ आणि शिक्षणमंत्री स्मृती इराणी यांना भेटून या संस्थांचे केंद्र नाशिकला मिळावे, याकरिता गळ घातली जाणार आहे. याकरिता काय-काय करता येणे शक्य आहे, याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.