आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-मुंबई 38 मिनिटांत; ऑक्टोबर महिन्यापर्यंत हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला देणार अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रवाशांच्या वेळेत बचत होण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला. या मार्गाचे काम प्रगतिपथावर असताना आता ८ हजार किलोमीटर अंतराच्या सहा बुलेट ट्रेनसाठी मार्गाचा अहवाल ऑक्टोबर महिन्यापर्यंत हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने मागितला आहे. या मार्गामध्ये मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार असून विशेष म्हणजे ही रेल्वे नाशिक, औरंगाबादमार्गे धावणार आहे. त्यामुळे नाशिकला थांबा झाल्यास नाशिककर अवघ्या ३८ मिनिटांमध्ये मुंबईला पोहोचतील, तर मुंबई-नागपूर हे सुमारे आठशे किलोमीटरचे अंतर तीन तासांत पार करता येणार आहे.  
 
केंद्र सरकारने दिल्ली-चेन्नई, दिल्ली-कोलकाता,  मुंबई -दिल्ली, चेन्नई-दिल्ली बुलेट ट्रेन सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तसेच दिल्ली-वाराणसी आणि मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण होणार असून ऑक्टोबर महिन्यापर्यंत रेल्वे भवनला अहवाल सादर करण्यात येणार आहे. देशातील सर्व बुलेट ट्रेन या सन २०३२ पर्यंत सुरू करण्यात येतील, तर मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन ही २०२४ पर्यंत सुरू करण्याचे हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे नियोजन आहे. यासाठी जपान, चीन, स्पेन, फ्रान्स आणि इटली या देशातील कंपन्या इच्छुक आहेत.     

यामार्गे जाणार बुलेट ट्रेन
मुंबई आणि नागपूर अंतर कमी वेळेत पार पाडण्यासाठी हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने बुलेट ट्रेन सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सर्वेक्षण करण्यात येऊन ऑक्टोबरपर्यंत याचा अहवाल रेल्वे भवनला देण्यात येणार आहे. या बुलेट ट्रेनच्या मार्गावर नाशिक, औरंगाबाद, अकोला आणि अमरावती या शहरांत थांबा असेल.
बातम्या आणखी आहेत...