आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-मुंबई रेल्वेसाठी पाठपुरावा; केंद्राच्या निधीतून रुग्णवाहिका देणार - खासदार समीर भुजबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - दिवाळीच्या सुट्टीत मध्य रेल्वेने सुरु केलेल्या मुंबई-नाशिक हॉलीडे स्पेशल गाडीला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद लाभलेला असतांना मुख्यालयाला पाठविण्यात आलेल्या चुकीच्या अहवालामुळे ही गाडी कायमस्वरुपी सुरु होऊ शकली नसल्याची बाब सोमवारी खासदार समीर भुजबळ यांच्या दौर्‍याप्रसंगी उघड झाली. ही गाडी सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

या गाडीच्या प्रतिसादाबाबत माहिती देताना रेल्वे अधिकार्‍यांमध्ये एकमताचा अभाव दिसून आला. दुपारच्या वेळेत मुंबईला जाण्यासाठी नाशिकवरुन गाडी नसल्याने ही गाडी सुरु करण्यासाठी आवश्यक अहवाल मुख्यालयास पाठविल्यास गाडी सुरु होण्यासाठी पाठपुरावा करू असे यावेळी भुजबळ यांनी सांगीतले. कसारा-नाशिक शटल सेवेबाबत केवळ पाठपुरावा करता येईल, प्रशासनाची तयारी नसल्यास आग्रह करता येणार नाही. कसारा-नाशिक प्रवासासाठी पुर्वीपेक्षा फारच कमी वेळ लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार समीर भुजबळ यांनी सोमवारी सकाळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभुमीवर नाशिकरोड रेल्वे स्थानकावर कोणती विकास कामे करणे आवश्यक आहे व मंजुर कामांना सुरुवात कधी होणार याची माहिती घेऊन पहाणी केली.संबधित अधिकार्‍यांन सूचना दिल्या. चौथा प्लॅटफॉर्म, बस स्थानकाचे स्थलांतर व सुशोभिकरण, पार्किंग, पुर्व बाजूकडे आरक्षण, तिकिट खिडकी, प्रवेशव्दाराबाबत सूचना दिल्या.

विकासकामांसाठी पाठपुरावा
सिंहस्थापुर्वी रेल्वे, बस स्थानकाचे नियोजनबध्द सुशोभिरण व सर्वाधिक विकास कामांसाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती खासदार भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कामे रेल्वे किंवा बाहेरच्या यंत्रणेकडून करणे शक्य आहे त्याचा आढावा घेतला जात आहे. महापालिकेने रेल्वेला देय असलेल्या पैशांबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली असून चौथ्या प्लॉट फॉर्म बाबत रेल्वेकडून केलेल्या नियोजनाची माहिती घेतली.

खासदार निधीतुन रुग्णवाहिका
दौर्‍याप्रसंगी प्रवाशांनी रुग्णवाहिकेअभावी प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर खासदार निधीतून तातडीने रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन समीर भुजबळ यांनी दिले. यावेळी स्येशन अधीक्षक एम. बी. सक्सेना, वाणिज्य अधिकारी एस. डी. किर्तीकर, तांत्रिक अधिकारी सय्यद यांच्यासह विविध अधिकारी तसेच नाशिकरोड राष्ट्रवादीचे अध्यक्ष मनोहर कोरडे, राजेंद्र मोरे आदि उपस्थित होते.