आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे ‘बजेट’ कोलमडणार, नवनिर्माणास लागणार ‘ब्रेक’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘एलबीटी’मुळे घटलेले उत्पन्न सिंहस्थ कामांचा बाेजा यामुळे दबलेल्या सत्ताधारी मनसेने विधानसभा निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून सादर केलेले तीन हजार काेटींचे ‘जम्बाे बजेट’ पूर्णत: काेलमडण्याची चिन्हे निर्माण झाली असून, डिसेंबरअखेरीस जेमतेम सहाशे काेटींचे उत्पन्नच महापालिकेच्या तिजाेरीत जमा झाले अाहे.
सिंहस्थ अनुदान, कर्ज तीन महिन्यांत अपेक्षित तीनशे काेटींचा विचार केला, तर जास्तीत जास्त ११०० काेटींचे उत्पन्न हाती येऊ शकते, असे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे अाहे. त्यामुळे नवनिर्माणाच्या अनेक याेजनांना ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे अाहेत.
दाेन वर्षांपासून जकातीएेवजी एलबीटी अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्था कर शहरात लागू असून, त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात तूट अाली अाहे. पहिल्या वर्षी जकातीच्या तुलनेत जवळपास अडीचशे काेटींची तूट महापालिकेला साेसावी लागली. ही रक्कम भरून देण्याचे राज्य शासनाने दिलेले अाश्वासनही पाळले गेलेले नाही. दरम्यान, चालू अार्थिक वर्षात एलबीटी जाणार, या राजकीय पटलावरून रंगलेल्या घाेषणावजा अाश्वासनांमुळे वसुलीवर परिणाम झाला. गेल्या दाेन महिन्यांत एलबीटी रद्द करण्यासंदर्भातील हालचाली मंदावल्यावर व्यापाऱ्यांनी कर भरण्याकडे अाेढा दाखवल्यावर अाता काेठे जवळपास साडेसहाशे काेटी एलबीटी वसूल हाेण्याची चिन्हे अाहेत.
उत्पन्नाचा अालेख मंदावला असताना अाता सत्ताधारी मनसेने िनवडणुकीच्या ताेंडावर सादर केलेले ‘जम्बाे बजेट’ काेलमडण्याची चिन्हे अाहेत. डिसेंबर अखेरीस महापालिकेला ५७३ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळाले अाहे. महापालिकेच्या अायुक्तांनी स्थायी समितीवर सादर केलेले अंदाजपत्रक १८७५ काेटींचे असून, त्यात उत्पन्नाचा अंदाज ११५० काेटींचा अाहे. या पार्श्वभूमीवर अाताच चारशे काेटींची तूट असून, एलबीटी, घरपट्टी-पाणीपट्टीतून येत्या तीन महिन्यांत ही तूट भरून निघेल, असेही सूत्रांचे म्हणणे अाहे. मात्र, अायुक्तांनंतर पुढे स्थायी समिती महासभेने केलेल्या जवळपास १२०० काेटी रुपयांची वाढीतून अपेक्षित असलेली कामे मात्र संकटात सापडणार अाहेत.

पुढील वर्षी ३७० काेटींचा बाेजा
चालूवर्षी निधीच्या ठणठणाटामुळे नगरसेवकांची कामे रखडली हाेती. पुढील वर्षी यापेक्षाही खडतर दिवस येण्याची भीती असून, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १३५ काेटींचा खर्च अनिवार्य असेल. याबराेबरच ११५ काेटी जवाहरलाल नागरी नेहरू पुनरुत्थान, तसेच मुकणे धरणातील पाणीपुरवठा याेजनेसाठी ११० काेटी असा जवळपास ३७० काेटींचा बाेजा पडणार अाहे.

गेल्या तीन वर्षांतील उत्पन्न
सन२०१२-१३ १०००४ काेटी
सन २०१३-१४ ९१४ काेटी
सन २०१४-१५ ५१५ काेटी (डिसेंबरपर्यंत)