आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधराशे पदांची भरती; मनसे-प्रशासन सामना, भरतीवरील निर्बंधाबाबत मनसे विचारणार जाब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या ताेंडावर अाता सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अास्थापना खर्चात समाविष्ट असलेल्या १५५० रिक्त पदे भरण्यासाठी अाक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला असून, अत्यावश्यक सेवांशी संबंधित पदांसाठी खर्चाची तरतूद असताना भरतीवर निर्बंध लादण्याचे कारण काय, असा सवाल केला जाणार अाहे. प्रशासनाकडून हाेणाऱ्या अडवणुकीबाबत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडेही तक्रार केली जाणार असून, प्रसंगी राज्य शासनाशी लढण्याचीही तयारी अाहे.
महापालिकेत ७०० सफाई कर्मचाऱ्यांची मानधनावर नियुक्ती करण्यावरून सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असा वाद सुरू अाहे. सत्ताधाऱ्यांनी ही पदे ठेकेदारीकरणाला फाटा देऊन मानधनावर भरती करण्याचा ठराव केला हाेता. मात्र, अायुक्तांनी याबाबत मार्गदर्शन मागवल्यावर शासनाने ठराव निलंबित केला. मानधनावरील कर्मचारी पुढे न्यायालयात जाऊन कायमस्वरूपी नियुक्तीसाठी दावा करतात, असे कारण देत अाउटसाेर्सिंगद्वारे थाेडक्यात खासगीकरणाद्वारे भरती करण्याचेही अादेश शासनाने दिले हाेेते. त्यानुसार अायुक्तांनी महासभेवर शासन अादेश ठेवल्यावर सर्वच पक्षांनी एकत्रितरीत्या मानधनावरील भरतीप्रक्रियेच्या निर्णयावर ठाम राहण्याचा सूर व्यक्त केला. त्यानुसार महासभेचा ठराव शासनाला पाठवण्याचे ठरले. पालिका निवडणुकीच्या ताेंडावर थेट मानधनावर भरती झाली तर त्याचे श्रेय मनसेला मिळेल, या भीतीतून राज्यातील भाजप सरकारकडून अाडकाठी अाणली जात असल्याचे मानून सत्ताधाऱ्यांनी अाक्रमक पवित्रा घेतला अाहे. मानधनाची तर साेडा, मात्र महापालिकेच्या अास्थापनावरील कायमसेवेतील १५५० रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू केला अाहे. या पदांसाठी अंदाजपत्रकात यापूर्वीच जवळपास तीनशे काेटींची तरतूद असल्यामुळे अास्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे कारण तकलादू ठरत असल्याचे मनसे सभागृहनेत्या सुरेखा भाेसले यांनी सांगितले. महापालिकेची ७०९० पदे असून, त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात अाहे. त्यामुळे त्यापैकी रिक्त असलेल्या १५५० पदे भरण्याचे ठरले तर अंदाजपत्रकाबाहेर जाऊन अतिरिक्त खर्च कसा येणार याची कारणमीमांसा प्रशासनाने करावी, असेही अाव्हान त्यांनी दिले अाहे.

नऊशे मानधनावरील कर्मचाऱ्यांचे काय? : महापालिकेत७०० सफाई कर्मचाऱ्यांना मानधनावर घेतले तर न्यायालयात जाऊन पुढे कायम हाेण्यासाठी दावा करणाऱ्या प्रशासनाला मनसेने अाता ९३५ मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भीती वाटत नाही का, असा सवाल केला अाहे. त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस अन्य विविध संवर्गातील कर्मचारी असून, गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या करारनाम्यात अशा काय अटी अाहेत की ज्यामुळे ते कायमस्वरूपी नाेकरीसाठी दाद मागत नाही, असाही सवाल केला अाहे. त्याच धर्तीवर ७०० सफाई कर्मचारी थेट महापालिकेने नियुक्त करावे, अशी मागणी केली जाणार अाहे.
पालिका अायुक्तांचे लक्ष वेधणार
^अास्थापना खर्चात समाविष्ट १५५० पदावर नाेकरभरती करण्यात अडचण नाही. या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात असल्याने बाेजा पडणार नाही. दुसरीकडे मानधनावरील ९०० कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली नसल्याने उगाच भीती बाळगण्याचे कारण नाही. पालिकेने थेट भरती करावी. -सुरेखा भाेसले, सभागृहनेत्या,मनसे.
बातम्या आणखी आहेत...