आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागांचा मिळेना ताबा, तरी भूमिपूजनांचा धडाका, जागा ताब्यात नसताना निविदा काढून कार्यादेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘आंधळंदळतं आणि कुत्रं पीठ खातं’ या म्हणीचा प्रत्यय महापालिकेला वारंवार येत असून, ‘टक्केवारी’च्या आमिषापोटी जागा ताब्यात नसतानाही त्याच्या निविदा काढून कार्यादेश देण्याचे प्रकार आता सर्रासपणे होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, सत्ताधारी आणि प्रशासन प्रमुखही या पद्धतीला आळा घालण्याऐवजी त्यात सहभागी होत आहेत. साधुग्रामच्या जागेच्या निमित्ताने या पायंड्याला पुन्हा एकदा उभारी देण्यात आली आहे.
आगामी कुंभमेळ्यात साधुग्रामसाठी तपोवनातील २६९ एकर जागा साधुग्रामसाठी अधिग्रहीत करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु, ही जागा ताब्यात घेण्याच्या आधीच सत्ताधारी या जागेचे भूमिपूजन करून मोकळे झाले आहेत. महासभेत काथ्याकूट होऊनही साधुग्रामच्या जागा अधिग्रहणाचा प्रश्न सुटत नसताना यासंदर्भातील प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना भूमिपूजनाची सत्ताधाऱ्यांना घाई का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
जेलरोडचाखर्च कोटींवरून १८ कोटींवर : गोदावरीते बिटको पॉइंट परिसराचा समावेश असलेल्या जेलरोड रस्त्यासाठी जागा ताब्यात नसतानाही निविदा काढल्या आणि त्यानंतर कार्यादेश देण्यात आले. त्यामुळे प्रस्तावित कोटी खर्चाऐवजी या रस्त्यासाठी तब्बल 18 कोटींपर्यंत खर्च झाला.
गंगापूरएसटीपीचेही भिजत घोगडे : कुंभमेळ्याच्यापार्श्वभूमीवर गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी गंगापूर येथे सुमारे चार हेक्टर जागा घेण्यासाठी पालिका चार वर्षांपासून आटापिटा करीत आहे. या जागेच्या भूसंपादनापोटी नऊ कोटी रुपये अदा केले गेले. परंतु, अद्यापही जागा ताब्यात आलेली नाही. या जागेचे मालकही पालिकेच्या कार्यवाही विरोधात न्यायालयात गेले आहेत.
संमतीअसूनही रखडले काम : यामध्येतपोवनातून टाकळीकडे जाणाऱ्या पुलाला जाेडणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनास परिसरातील शेतकऱ्यांनी संमती दिली असतानाही तो रखडला होता, हे विशेष.