आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांचा भडका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात २० टक्के पाणीकपात लागू झाल्यानंतर संयमाने त्याचा स्वीकार करणाऱ्या नाशिककरांच्या ताेंडचे पाणी निव्वळ पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियाेजनामुळे पळाल्याचे चित्र बघून उपमहापाैर गुरुमित बग्गा, मनसे महानगरप्रमुख राहुल ढिकले यांच्यासह नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. विशेषत: पंचवटी गावठाण परिसरात पंधरा मिनिटेही पाणी राहत नसल्याचा अनुभव पहाटे फिरून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना द्वारकासह तपाेवन, अाडगाव, नांदूर-मानूरकडील पाणीपुरवठा निलगिरी बागेच्या जलकुंभावर स्थलांतरित करण्यावर खल झाला.

कुंभमेळ्यामुळे पंचवटी परिसरात पाण्याची अाेरड असताना अाता उत्सव संपल्यानंतरही समस्या कायम अाहे. पंचवटी जलशुद्धिकरण केंद्रातून म्हसरूळ, पेठराेड, मखमलाबाद, अाडगाव, द्वारका अादी पूर्व पट्ट्यात पाणीपुरवठा केला जाताे. मध्यंतरी निलगिरी बागेत दाेन जलकुंभ बांधण्यात अाले. मात्र, हे जलकुंभ दुरुस्तीसाठी बंद असल्यामुळे सर्व भार पंचवटी जलशुद्धिकरण केंद्रावर येत असल्याचे वृत्त अाहे. परिणामी पेठराेड, हिरावाडी, पंचवटी कारंजा येथे पाणीच येत नसल्यामुळे नगरसेवक संतप्त झाले हाेते. पंचवटी जलशुद्धिकरण केंद्रावरील भार कमी करण्यासाठी निलगिरी बागेतील जलकुंभ सुरू करून द्वारका, अाडगाव, नांदूर-मानूर परिसरातील पाणीपुरवठा स्थलांतरित केल्यास मूळ पंचवटी परिसरातील पाणीप्रश्न निकाली निघेल, असे नगरसेवकांचे म्हणणे अाहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उदय धर्माधिकारी यांना बाेलावून उपमहापाैरांसह नगरसेवकांनी प्रश्नांचा भडिमार केला. धर्माधिकारी यांनी टाक्यांतून पाणी साेडण्याचे, तसेच काेणते व्हॉल्व्ह सुरू वा कधी बंद करायचे, याचे वेळापत्रक निश्चितीच्या टप्प्यात असल्याचे सांगत लवकरच समस्या सुटेल, असे सांगितले.

भरतीच नाही तर प्रश्न सुटेल कसा?
दरम्यान,पाणीपुरवठा विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अपुऱ्या मनुष्यबळाकडून नवीन टाक्यांसाठी कर्मचारी द्यायचे काेठून, असा प्रश्न अाहे. पहाटे वाजता पाणी साेडले तर लाेकांना मिळणार असून, सिंहस्थात नवीन टाक्या बांधल्या गेल्या. मात्र, त्यांचे काम करण्यासाठी कर्मचारीच नसल्यामुळे पाणीसंकटाचा सामना करणे येत्या काळात आणखी कठीण बनणार अाहे.