आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमबाह्य ठरावांवर अायुक्तांचे बाेट, पदभार स्वीकारून वर्ष संपल्यानंतर स्मरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महासभा,स्थायी समिती अन्य सभांमध्ये पारित हाेणाऱ्या ठरावांमध्ये नेमक्या काेणत्या नियमांचा अाधार घेतला याबाबत काेणतेही स्पष्टीकरण दिले जात नसल्याचा अाक्षेप घेत महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी यापुढे महापाैर, उपमहापाैर स्थायी समिती सभापती या सर्वांना ठराव करताना नियम वा काेणत्या तरतुदींचा अाधार घेतला याबाबत स्पष्टता करण्याबाबत अवगत करण्याचे पत्र काढले अाहे.

दरम्यान, कायद्याच्या चाैकटीत राहून कामकाज करण्याची अाेळख असलेल्या अायुक्तांना पदभार स्वीकारून वर्ष झाल्यानंतर या नियमांची जाणीव करून द्यावी लागली, याविषयी तर्कवितर्क लढवले जात अाहेत. अायुक्तांनी नगरसचिवांना पत्र पाठवून महासभा, स्थायी समिती सभेतील कामकाजाविषयी नियमावलीची अाठवण करून दिली अाहे.

या पत्रात म्हटले अाहे की, ठराव पारित कशाच्या आधारे केला याबाबत स्पष्ट उल्लेख नसताे. त्यामुळे ठरावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेते. उदाहरणार्थ १९ सप्टेंबरला २१ ते २९ नाेव्हेंबरदरम्यान अायर्लंड येथे हाेणाऱ्या किक बाॅक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी प्रीतिश बैरागी यांना ५० हजारांचे अनुदान मंजुर करत असल्याचा ठराव पारित झाला. मात्र, तो करताना नियम वा तरतूद काेणती याबाबत स्पष्टता नाही.
या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी ठराव करताना िनयमाचा उल्लेख करण्याबाबत अवगत करण्याविषयी दिलेल्या पत्रात शिक्षण महिला बालकल्याण समिती सभापतींचाही उल्लेख केला आहे.
महासभेत १९१ काेटींच्या रस्ते डांबरीकरणाच्या प्रस्तावात जवळपास दाेन हजार काेटींची कामे घुसवल्याचा अाराेप करत स्मार्ट सिटी, अमृत, नदी संवर्धन याेजना अन्य प्रस्तावांना पदाधिकाऱ्यांनी ब्रेक लावला हाेता. या वेळी प्रशासनाकडून बेकायदेशीर प्रस्ताव कसे अाले, याचाही समाचार घेत एकप्रकारे अायुक्तांच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले हाेते. या पत्रामुळे अाता पदाधिकाऱ्यांनाही वर्षानुवर्षांपासून कामकाजातील त्रुटी लक्षात अाणून देऊन काेंडीत पकडण्याचा प्रयत्न झाल्याचा सूर व्यक्त हाेत अाहे. विशेष म्हणजे नियमांबाबत सजग असणाऱ्या अायुक्तांना सूत्रे हाती घेऊन वर्ष झाल्यावर या नियमांची जाणीव करून देण्याचे का सुचले, असाही सवाल चर्चेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...