आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेला अाली जाग, मात्र पुन्हा हाेईल भागम् भाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अंबड अाैद्याेगिक वसाहतीत पावसाळापूर्व नालेसफाई, रस्ते डागडुजी, पथदीप दुरुस्ती अशी कामे करणाऱ्या महापालिकेला अाता जाग अाली अाहे. या वसाहतीची पहिल्याच पावसात दैना झाली अाहे. याचा लाइव्ह रिपाेर्ट ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केल्यानंतर पालिकेला जाग अाली असून, तात्पुरत्या स्वरूपात काही रस्त्यांवर मुरूम टाकून डागडुजी करण्याचे काम सुरू झाले अाहे. मात्र, उशिराने अालेल्या या शहाणपणामुळे माेठा पाऊस अाल्यानंतर मात्र भागमभाग करायला भाग पाडणार अाहे.

चाळणी झालेले अंतर्गत रस्ते, रस्त्यांवर साचलेले पाणी, निम्म्याहून अधिक पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य यामुळे उद्याेजक-कामगारांना होणारा त्रास अाणि हाेणारे अपघात यावर ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी डीबी स्टारमध्ये प्रकाश टाकला हाेता. यानंतर पालिकेने डी सेक्टरमध्ये जेथे रस्ता खाेल, तर कंपन्या उंचावर असल्याने कंबरेइतके पाणी साचले हाेते, तेथे मुरुमाची भर टाकली. मात्र, त्यामुळे अाता रस्ता उंच, तर कंपन्या खाली गेल्या असून, पुन्हा पाऊस अाला, तर पाणी कंपन्यांत घुसल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती अाहे. नाल्यांच्या सफाईकरिता जेसीबीचा वापर केला असला, तरी ही नालेसफाई पुरेशी नाही. पथदिपांची दुरुस्ती नसल्याने अाता हाेणाऱ्या अपघातानंतर पालिकेलाच जबाबदार धरून तशा तक्रारी करणार असल्याचे काही उद्याेजकांनी सांगितले.
पहिल्याच पावसामुळे अंबड अाैद्याेगिक वसाहतीत जेथे गुरुवारी असे पाणी साचलेे हाेते, तेथे अाता महापालिकेच्या वतीने मुरुमाची अशी माेठी भर रस्त्यावर टाकून हा रस्ता उंच करण्यात अाला अाहे. रविवारी तेथील स्थिती अशी दिसत असली तरी माेठ्या स्वरूपात पाऊस काेसळल्यास यामुळे येणारे पाणी कंपन्यांसाठी त्रासदायक ठरणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...