आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिका: पाेटनिवडणुकीतील उमेदवारांचा प्रचार ‘झिंगाट’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड- उरात होतंय धडधड, निवडणूक ताेंडावर आली, वाॅर्डात भरलं वारं, विकासाची बाधा झाली आता अधीर झालोया, मग बधीर झालोया विकासाची कास धरून पुढं जाऊ या दादा जाेरात, जिंकणार रंगात, निवडून अालाेया विकास हाेणार झिंगझिंग झिंग झिंग झिंगाट... अशा झिंगाट गाण्यांनी सध्या प्रभाग क्रमांक ३५ अाणि ३६ मधील वातावरण ‘सैराट’ झालं अाहे. निमित्त अाहे पाेटनिवडणुकीचे.

पाेटनिवडणूक केवळ चार दिवसांवर अाली असून, प्रचाराचा चांगलाच धुराळा उडतो अाहे. निवडणुकीत जिंकून येणाऱ्या उमेदवाराला केवळ सहा महिन्यांचाच कालावधी मिळणार असला तरीही ही अागामी निवडणुकीची ही रंगीत तालिम मानली जात असल्याने भाजप, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आरपीआय या प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरविले अाहेत.

त्यांनीही विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे बहुसंख्य उमेदवार सैराट चित्रपटातील गाण्यांचा अाधार घेऊन आपल्या भागातील मतदारांना प्रभावीत करणयासाठी जोरदार प्रचार करत अाहेत.

‘सैराट’ने तरुणाईला वेड लावलेच. पण, राजकारण्यांसह इतर क्षेत्रातील नागरिकांनाही भुरळ घातली. त्याचीच प्रचिती या निवडणुकीत येत अाहे. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक संगीतकारांकडून सैराटच्या चालीवर प्रचाराची गाणीही तयार करुन घेण्यात अाली अाहेत. अर्थात काहींनी केलेल्या गाण्यात यमक जुळविण्यावरच भर देण्यात अाला अाहे. त्यामुळे या गाण्यांकडे प्रभावित हाेणारी मंडळी माेजकीच असल्याचे दिसते. केवळ मनाेरंजन म्हणून मतदार ही गाणी एेकताना दिसतात. सैराटमधील “झिंगाट’ गीताबराेबर ‘यडं लागलं’ या गाण्याचेही प्रचारगीतात रूपांतर करण्यात अाले अाहे. त्यात विराेधी उमेदवारांची नाचक्की करताना विकासाची अाश्वासनेही देण्याचा प्रयत्न केला जात अाहे.

अतिरेकी प्रचाराने डाेकेदुखी
पाेटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पाेहोचल्याने दिवसभर चारचाकी प्रचार रथांद्वारे मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून हाेत अाहे. परंतु या नादात एकाच ठिकाणी एकापाठाेपाठ एक प्रचार रथ फिरत असून, त्यात सैराटच्या गाण्यांवर भर देण्यात अाला अाहे. या अतिरेकी प्रचाराने मतदारही वैतागले असून, अनेकांना ही निवडणूक कधी संपते असे झाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...