आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 कोटी खर्चून बुजविणार खड्डे, नाशकातील जुने रस्ते होणार चकाचक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दहा वर्षांपेक्षा अधिक काळ लाेटून जुन्या झालेल्या डांबरीकरणाला अस्तरीकरणाच्या माध्यमातून चकाचक करण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाने स्थायी समितीवर ८० काेटी रुपये खर्चाचे १३ प्रस्ताव ठेवले अाहेत. त्यातून सहाही विभागांतील महत्त्वाचे मार्ग तसेच काॅलनीअंतर्गत रस्त्यांची कामे हाेणार असून, पालिका निवडणुकीच्या ताेंडावर सत्ताधारी मनसेला श्रेय घेण्याची संधीही मिळणार अाहे.

अनेक वर्षांपासून नगरसेवकांकडून रस्त्यांची मागणी हाेत हाेती. मात्र, अार्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे कारण देत रस्त्यांच्या कामांना नाकारले जात हाेते. दरम्यान, कुंभमेळ्यात ४०० काेटी खर्चून शहरात रिंगराेडसह काही प्रमुख कामे करण्यात अाली.

अाचारसंहितेची भीती
सध्या महापालिका क्षेत्रात नाशिकराेड विभाग प्रभाग ३५ ३६ ‘ब’मध्ये पाेटनिवडणुका सुरू असून, या पार्श्वभूमीवर मतदानानंतरच स्थायी समितीची सभा बाेलवून प्रस्ताव मंजूर हाेण्याची शक्यता अाहे. जेणेकरून मनसेकडून अाचारसंहितेचा भंग केल्याचा अाक्षेप काेणी घेणार नाही. दुसरी बाब म्हणजे, नाेव्हेंबरमध्ये प्रारूप प्रभागरचना जाहीर हाेणार असल्यामुळे ताेपर्यंत तरी अाचारसंहितेच्या कचाट्यात कामे अडकण्याची भीती नाही. या पार्श्वभूमीवर अाता प्रशासनानेही धावपळ करून प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केले अाहेत.

या प्रमुख मार्गांचे पालटणार भाग्य
अशाेका मार्ग, विजय-ममता थिएटर ते वडाळा रस्ता : काेटी८८ लाख २७ हजार
खत प्रकल्प ते गाैळाणे : काेटी४३ लाख ३४ हजार
त्रिमूर्ती चाैक ते डीजीपीनगर : काेटी९५ लाख ११ हजार

विभाग निहाय अशी हाेणार कामे
नाशिक पूर्व : २१ काेटी ३० लाख ५० हजार
नाशिक पश्चिम : १३ काेटी ३८ लाख ७४ हजार ८६७
पंचवटी: काेटी ५६ लाख ८९ हजार
सिडकाे: काेटी ५६ लाख ५३ हजार
नाशिक राेड: काेटी५२ लाख ३३ हजार ६५७
सातपूर: काेटी३७ लाख ९८ हजार

नाशिकच्या वेशीवर काेटी ३४ लाखांचे प्रवेशद्वार
मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी नाशिकच्या प्रवेशद्वारावर मुंबईकडून येताना प्रवेशद्वार तयार करण्याची संकल्पना मांडली हाेती. त्यासाठी काेटी ३४ लाख ९८ हजार रुपये रकमेचे काम केले जाणार अाहे. विल्हाेळीजवळ हे प्रवेशद्वार असणार अाहे. याव्यतिरिक्त गरवारे चाैकात ९६ लाख ९९ हजार, लेखानगर चाैकात ८९ लाख ९९ हजार, तर मुंबई नाका ते संदीप हाॅटेल चाैक विकसित करण्यासाठी काेटी ३४ लाख ९६ हजारांची कामे हाेणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...