आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायुक्तांच्या प्रस्तावाला ‘स्थायी’ने दाखवला ‘खड्ड्या’चा रस्ता...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका अायुक्तांनी खड्डे भरण्याच्या नावाखाली ठेकेदारांचे चांगभले करण्याचे प्रकार राेखण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने वेळखाऊ तांत्रिक अडचणीचे कारण देत ‘खड्ड्या’चा रस्ता दाखवला. अॅपद्वारे खड्ड्यांचे माेजमाप करायचे, त्यानंतर कामे मंजूर करायची, असा फंडा रेंज नसल्यामुळे फाेल ठरत असल्याचे सांगत स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी असे प्रस्ताव पुन्हा अाणू नका, अशी तंबीही दिली.

महापालिकेच्या सहाही विभागांत २५ काेटी रुपयांचा खड्डे दुरुस्तीचा प्रस्ताव हाेता. त्यावर स्थायी समितीत चांगलाच गदाराेळ झाला. अाताच कुंभमेळ्यानिमित्त जवळपास ४५० काेटी रुपयांचे रस्ते झाल्यामुळे काेणते खड्डे भरणार, असा सवाल सदस्यांनी केला. त्यावर कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांनी काॅलनीअंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याचे सांगत या रस्त्यांवरील खड्डे भरण्याविषयी नगरसेवकांचीच मागणी येत असल्याचे सांगितले. त्यानंतर सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. सुरेखा भाेसले यांनी खड्डे दुरुस्तीची वेळच का अाली, असा सवाल केला. शाेभा फडाेळ यांनी मक्तेदारामार्फत रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत गेल्या तीन वर्षांत रस्ते दुरुस्तीवर झालेल्या खर्चाची माहिती मागवली. संगीता गायकवाड यांनी विशिष्ट भागातील रस्तेदुरुस्ती केली जात असल्याचा अाराेप करीत प्रभागनिहाय रस्ते दुरुस्तीसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. जेणेकरून नगरसेवकांना माहिती असलेले वा तक्रारी असलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करता येईल, असे सांगितले.

दरम्यान, यशवंत निकुळे यांनी अायुक्तांच्या नवीन अादेशाची माहिती देत काेणताही खड्डा भरण्यापूर्वी प्रथम त्याचे फाेटाे घ्यायचे, मेजरमेंट करायचे त्यानंतर मंजुरी घेऊन दुरुस्ती करायची सक्ती केल्याचा दावा केला. या प्रक्रियेत अहवाल कधी देणार प्रत्यक्ष काम कधी हाेणार, हा माेठा प्रश्न असल्याची चिंता व्यक्त केली. अापल्या प्रभागात गटारी फुटल्यानंतर प्रथम त्याचा फाेटाे घ्यायचा त्यानंतर दुरुस्ती करण्याचे अादेश असल्याचे उपअभियंत्यांनी सांगितले. सुटीचा िदवस त्यात अॅपवर लाेड करण्यात नेटवर्कमुळे अडचण येत असल्यामुळे तब्बल तीन िदवस फुटलेली गटार वाहत राहिल्याच्या प्रकाराकडे निकुळे यांनी लक्ष वेधले. त्यावर चव्हाण यांनी एक अॅप तयार केले असून, त्यात फाेटाे टाकायचा त्यानंतर मंजुरी घ्यायची, अशी प्रक्रिया असल्याचे सांगितले. त्यावर सभापती चुंभळे यांनी नाराजी व्यक्त करीत अाधीच महापालिकेचे अधिकारी स्पाॅटवर नसतात. ते फाेटाे कधी काढणार काम कधी हाेणार, असा सवाल केला. अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांनी खड्ड्यांसाठी फाेटाेची सक्ती नसून, काेणतेही काम करण्यापूर्वी वा झाल्यानंतर फाेटाेद्वारे त्याची माहिती देण्याचे बंधन असल्याचे सांगितले. चुंभळे यांनी अशाप्रकारे काम करण्याची गरजच नसून, हे काय प्रसिद्धीचे काम अाहे का, असाही चिमटा घेतला. दरम्यान, गरज ध्यानात घेऊन २५ कोटींचा हा ठेका अखेर मंजूर करण्यात आला.

शहर अभियंता गायब
शिवसेनेने खड्डे दुरुस्तीच्या मुद्यावरून शहर अभियंता सुनील खुने यांना घेरण्याची तयारी केली हाेती. खुने यांनी तयारीने सभागृहात हजेरीही लावली हाेती. प्रत्यक्षात अचानक अायुक्तांनी सांगितलेल्या कामाचे कारण देत ते बाहेर पडले. दरम्यान, शहर अभियंत्यांच्या उपस्थितीतच प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.