आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाेळकर पुलासह गाेदावरी पात्रातील सर्वच पुलांचे अाॅडिट, पालिका अायुक्तांचे अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गाेदावरीच्या पुरामुळे नवीन जुन्या नाशिकला जाेडणाऱ्या सर्वच जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल अाॅडिट करण्याचे अादेश पालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले असून, ब्रिटिशांनी अायुर्मान संपल्याचा इशारा दिलेल्या पूर्वीच्या व्हिक्टाेरिया अाताच्या अहिल्याबाई हाेळकर पुलाचेही स्ट्रक्चरल अाॅडिट हाेणार अाहे.

महाड येथे सावित्री नदीच्या महापुरात ब्रिटिशकालीन पूल पडल्याने तीन वाहनांतील प्रवाशांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच धाेकेदायक ब्रिटिशकालीन पुलांच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत अाला अाहे. महापालिका क्षेत्रात प्रामुख्याने शंभरहून अधिक वर्षांचे अायुर्मान असलेला हाेळकर पूल अाहे. या पुलाची बांधणी ब्रिटिशांनी १८९० च्या सुमारास केल्याचे सांगितले जाते. हे लक्षात घेतले तर या पुलाला सव्वाशे वर्षे झाले असून, महाडची घटना बघता, या पुलाचे स्ट्रक्चरल अाॅडिट करून घेण्याचे अादेश अायुक्तांनी दिले. गाेदावरीला अालेल्या महापुरात हाेळकर पूल डुबताे की काय, अशी भीती निर्माण झाली हाेती. यापूर्वी २००८ मध्ये महापुराचा सामना या पुलाने केला हाेता. या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षांत पुलाच्या संभाव्य हानीचीही तपासणी हाेणार अाहे. गरज भासल्यास शेजारील घारपुरे घाट, रामसेतू, गाडगे महाराज पुलाचेही स्टॅबिलिटी अाॅडिट केले जाणार अाहे.

अाॅडिट लवकरच
हाेळकर पुलासह पालिकेच्या अखत्यारीतील ज्या जुन्या पुलांची गरज अाहे, त्यांचे स्ट्रक्चरल अाॅडिट करण्याचे अादेश दिले अाहेत. लवकरच त्याचे अहवाल येतील त्याप्रमाणात कारवाई केली जाईल. -अभिषेक कृष्णा, अायुक्त, मनपा
दाेन वेळा हाेळकर पुलाचे नूतनीकरण
शहरअभियंता सुनील खुने यांनी तूर्तास हाेळकर पुलाबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. शंभरहून अधिक वर्षे झालेल्या या पुलाचे १९७९ मध्ये प्रथम नूतनीकरण डागडुजी केली. त्यानंतर २००३ मध्ये पूर्वीच्या व्हिक्टाेरिया पुलाला जिजामाता पूल असा रामवाडीच्या बाजूने समांतर पर्याय करण्यात अाला अाहे. त्यामुळे पुलावर पाण्याच्या येणाऱ्या दाबाचे विभाजन झाले. नवीन पुलाची लांबी १२० मीटर, तर १२ मीटर इतकी उंची अाहे.
बातम्या आणखी आहेत...