आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेचे एक पाऊल पुढे, कचरा जाळणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- घंटागाडीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐेवजी तो उघड्यावर जाळण्याचे सुरू असलेले प्रकार त्यामुळे प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेता, नाशिक महापालिकेने आता कचरा जाळणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेला तसे अधिकार नसले तरी, आयुक्तांकडे विशेष बाब म्हणून कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेतली. प्रामुख्याने पालिकेचे कर्मचारीच कचरा गोळा करून सकाळी सायंकाळच्या सुमारास जाळण्याचे प्रकार करीत असल्याची तक्रार केली. कचऱ्याबरोबर प्लास्टिक अन्य पर्यावरणाला घातक वस्तू जळून उग्र दुर्गंधीयुक्त धूर पसरतो. त्यामुळे सकाळचे आल्हाददायी वातावरण खराब होते अशी तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेत सोनवणे यांनी अतिरिक्त आरोग्यधिकारी सचिन हिरे यांना बोलवून घेत, जे कर्मचारी असे करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या. नागरिकही अशाप्रकारे कचरा जाळत असल्याची कैफियत मांडली. त्यावर सोनवणे यांनी उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करावी असा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला जाईल असे सांगितले. पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या या सूचनेचे ‘आप’ने स्वागत केले.