आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Doing Well Job In Mansoon

मान्सून आला दारात अन् पालिकेचे नियोजन जोरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मान्सून दारात येऊन ठेपला आहे व यंदा चांगला पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले तर अनेक रस्ते खड्डयात गेले असे असतानाही महापालिका मात्र सुस्त आहे. पहिला पाऊस पडल्यावर पालिकेने तातडीने मान्सुनपूर्व कामाच्या नियोजनाचो देखावा सादर करत प्रत्येक विभागाला तशा तातडीच्या सूचना आयुक्त संजय खंदारे यांनी दिल्या आहेत.

या सूचनांमध्ये बांधकाम विभागाने सर्व रस्त्यावरील खड्डे बुजवणे, नाल्यांची आणि गटारीची सफाई करणे, डांबरीकरण आणि कॉक्रिटीकरण जुनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करावी. त्यानंतर पावसाळा संपेपर्यंत डांबरीकरण आणि कॉक्रीटीकरण करु नये. पावसाचे पाणी रस्त्यावर साचणार नाही यासाठी बांधकाम आणि भुयारी गटार विभागाने कार्यवाही करावी. पाणी पुरवठा विभागाने पावसाळ्यात शुध्द पाणी पुरवठा करणे. जलवाहिन्याचीं गळती थांबवावी. विद्युत विभागाने पथदिपावरील वायरिंग, फिटिंग्ज व्यवस्थितरित्या कार्यरत असल्याची खात्री करावी. विज वितरण कंपनीच्या कृती आराखड्याबाबत विद्युत विभागाने कार्यवाही करावी. स्वच्छता व आरोग्य विभागाने डास, माशा यासाठी स्वच्छतेविषयक आराखडा तयार करुन साफसफाईची कामे करावी तर आपत्तकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही विभागाकडील वाहने मनुष्यबळ तत्पर ठेवावे. अग्निशमन आणि सुरक्षा विभागाने मॉकड्रिल घेऊन व्यवस्थेची चाचणी घ्यावी, अशा सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत.


धोकादायक इमारतींना नोटिसा देण्याचे आदेश
नगररचना विभागाने धोकेदायक इमारतींना घरे उतरविण्याबाबत किंवा दुरुस्त्या करण्याच्या नोटिसा द्याव्या. त्यानंतरही मालकांनी कारवाई न केल्यास नगररचना विभागाने कार्यवाही करावी. धोकेदायक वृक्षांचा सव्र्हे करून तोडण्यासारख्या झाडांचा प्रस्ताव तयार करावा. मंजुरीनंतर ते तोडण्यात यावे, असे आदेश देण्यात आले.