आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका शिक्षण सभापतिपदाची येत्या जुलै रोजी निवडणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर १६ सदस्यांमधून अस्तित्वात अालेल्या शिक्षण समितीच्या सभापतिपदासाठी येत्या जुलै राेजी निवडणूक हाेत अाहे. बऱ्याच वादामध्ये अडकलेली निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या अाहेत.महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नगरसेवकांमधून १६ सदस्यांची अविराेध निवड झाली. त्यानंतर सभापतिपदासाठी निवडणूक घेण्याकरिता महापालिकेने विभागीय अायुक्तालयाकडे प्रस्ताव पाठवला. प्रत्यक्षात भाजप अामदारांनी निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केल्यावर शासनाकडून त्याप्रमाणे कारवाई करण्यात अाली. त्यानंतर अपक्ष अाघाडीचे गटनेते संजय चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती उठवली. दरम्यान, त्यानंतर पालिकेने विभागीय अायुक्तालयाकडे निवडणूक घेण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला हाेता. त्यानुसार,निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जुलैला अर्ज वितरण दाखल, तर जुलै राेजी निवडणूक हाेणार अाहे.

महाअाघाडीचा हाेणार सभापती
मनसे-राष्ट्रवादीअपक्षांच्या महाअाघाडीची महापालिकेत सत्ता असून, महापाैरपद मनसेकडे, स्थायी समिती सभापतिपद राष्ट्रवादीकडे अाहे. अशा परिस्थितीत अपक्षांकडून संजय चव्हाण यांनी सभापतिपदासाठी दावा केला अाहे. सभागृहनेतेपदासाठी चव्हाण यांचे नाव चर्चेत हाेते. मात्र, सलीम शेख यांना हे पद दिल्यामुळे अपक्ष अाघाडी गट नाराज हाेता. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांना संधी दिली जाऊ शकते. मात्र, सहा सदस्यांच्या अाघाडीकडे उपमहापाैरपद असल्याचे कारण देत मनसेकडून या पदावर दावा हाेऊ शकताे. तसे झाले तर महाअाघाडीत फूट पडण्याची भीती अाहे.
बातम्या आणखी आहेत...