आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Election Process Going Online

पालिका निवडणूक प्रक्रिया आॅनलाइन, मुख्य निवडणूक आयुक्तांचे पालिका आयुक्तांना आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दाेन वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये हाेणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरणे अनिवार्य असणार असून, त्यादृष्टीने महापालिकेने तयारी करावी, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सर्व महापालिका आयुक्तांना व्हिडिआे काॅन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत दिल्या.

दाेन दिवसांपूर्वी सहारिया यांच्या उपस्थितीत सर्व मनपा आयुक्तांची बैठक झाली. त्यात उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी हाेणारी कसरत, त्यातून हाेणारे शक्तिप्रदर्शन त्यामुळे निवडणूक यंत्रणेचा जाणारा वेळ वाचवण्यासाठी आॅनलाइन उमेदवारी अर्जाची प्रक्रिया लागू करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यापूर्वी ग्रामपंचायत तसेच नगरपालिका निवडणुकीत अशा पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे प्रयाेग झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यात काहीसे अपयश आले. मात्र, महापालिका क्षेत्रात हायटेक सुविधा असल्यामुळे आॅनलाइन अर्ज प्रणाली लागू करण्याची तयारी करण्याचे आदेश दिले. यात मनपा एक संकेतस्थळ तयार करेल. त्यावर इच्छुक उमेदवारांनी नाेंदणी करून एक संकेतांक (पासवर्ड) प्राप्त करून घ्यावा लागेल. त्याद्वारे अर्ज भरता येईल. मात्र, अन्य दस्तएेवज, शपथपत्र आदी मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला प्रत्यक्ष भेटून सादर करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.