आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात मीनाताई ठाकरे मैदानावर पोलिसांचा गोळीबार; मालेगावात मिरवणुकीत दंगल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रभाग 3 मध्ये गुरुवारी मतमाेजणीदरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर परिस्थिती नियंंत्रणात आणताना पोलिस. - Divya Marathi
प्रभाग 3 मध्ये गुरुवारी मतमाेजणीदरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर परिस्थिती नियंंत्रणात आणताना पोलिस.
नाशिक/मालेगाव- पंचवटीतील प्रभाग 3 च्या मीनाताई ठाकरे मैदानातील मतमोजणी केंद्रात सायंकाळच्या सुमारास भाजप वगळता सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ उडाला.

तब्बल तीन तासांच्या गोंधळानंतरही मतमोजणी प्रक्रिया थांबविण्यास निवडणूक अधिकाऱ्याने नकार दिल्याने उमेदवारांच्या संतप्त समर्थकांनी केंद्राबाहेर येऊन दिसेल त्या वाहनांवर दगडफेक केल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. यात तीन पोलिस जखमी झाले. अखेर पोलिसांनी हवेत चार राउंड फायर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दुसरीकडे, मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे पूर्ववैमनस्यातून नवनिर्वाचित जि. प. सदस्य जे. डी. हिरे पराभूत उमेदवार दीपक नामदेव अहिरे उर्फ मायकल यांच्या गटात दंगल उसळल्याने गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी 15 ते 20 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

चार राउंड फायर 
रात्री 8 वाजेच्या सुमारास दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, परंतु परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती. जमाव हिंसक होत असल्याचे ब‌घून एका निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने चार राउंड हवेत फायर केल्याचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितले. दरम्यान, जमावाच्या दगडफेकीत 10  ते 15 दुकानांचेही नुकसान झाले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, निमगावला मिरवणुकीत दंगल; आठ गंभीर, पोलिसांचा लाठीमार 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...