आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Employee Designation Change

नाशिक महापालिकेत खांदेपालट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मनपा अधिकार्‍यांची आयुक्त संजय खंदारे यांनी अचानक खांदेपालट केली. उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन दिल्याने अनधिकृत व अतिक्रमित बांधकामांविषयी अपेक्षा निर्माण झाली आहे. परसेवेतील अधिकार्‍यांवरही जबाबदारी सोपविल्याने महासभेच्या ठरावाला पुन्हा वाटाण्याच्या अक्षदा लावल्या गेल्या.

दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दौर्‍यात अतिक्रमणे तात्काळ काढण्याची स्पष्ट सूचना केली. त्यानंतर आयुक्तांनी खांदेपालट करून सर्वांनाच धक्का दिला. उपायुक्त डी. टी. गोतिसे यांच्याकडील अतिक्रमण विभाग आर. एम. बहिरम यांच्याकडे दिला आहे. त्यांच्याकडे घरपट्टी, विविध कर विभाग, झोपडपट्टी सुधार योजना, विभागीय अधिकार्‍यांबरोबर समन्वय दिले. गोतिसेंकडे माध्यमिक शिक्षण, सर्व शिक्षा अभियान फेरीवाला झोन, सुवर्ण जयंती रोजगार योजना, अंगणवाडी, महिला व बालकल्याण देण्यात आले.

परसेवेतील अधिकारी चेतना केरुरे, वसुधा कुरणावळ यांना तातडीने शासन सेवेत परत पाठविण्याच्या महापौरांच्या ठरावानंतरही त्यांच्याकडे विविध कर तर कुरणावळ यांच्याकडे सुवर्ण जयंती रोजगार योजनेचा कार्यभार सोपविला आहे.

उपमुख्यलेखा अधिकारी सुलेखा घोलप यांची पदोन्नतीने मुख्य लेखा अधिकारी पदी निवड करण्यात आली. तथापि, अद्याप घोलप यांना पदोन्नतीचा आदेश देण्यात आलेला नाही. मात्र पदोन्नतीने पद भरलेले असतानाच या मंजूर जागी आदिवासी महामंडळाचे लेखापरीक्षक लांडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे हे पद आता वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.