आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Engineers Go To The All;ahabad For Kumbhmela

सिंहस्थ: नाशिक महापालिका अभियंते अलाहाबादला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अलाहाबाद येथील सिंहस्थ कुंभमेळ्याची व्यवस्था व नियोजन पाहण्यासाठी पालिकेच्या 6 अभियंत्यांचे पथक रवाना झाले.

नाशिक येथे होणार्‍या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय खंदारे आणि महापौर यतिन वाघ यांनी महासभेतच निर्णय घेऊन अभियंत्यांची टीम पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे कार्यकारी अभियंता जी. एम. पगारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता टी. एम. गायकवाड, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, सुनील रौंदळ, चंद्रशेखर आहेर, आर. एच. पाटील अभ्यासासाठी अलाहाबाद गेले आहेत. ही टीम अलाहाबाद येथील कुंभमेळ्यात तेथील प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेचा तसेच नियोजनाचा अभ्यास करतील. या अभ्यासाचा फायदा महापालिकेला कुंभमेळ्याच्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी होणार आहे.