आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायली काढण्यासाठी अायुक्तांनी ठाेकला तळ , खातेप्रमुखांची तातडीची बैठक घेऊन कामाचा घेतला अाढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाचारसंहिताताेंडावर असताना महापालिकेत तुंबलेल्या महत्त्वाच्या फायली निकाली काढण्यासाठी प्रभारी अायुक्त साेनाली पाेंक्षे-वायंगणकर यांनी अखेर तब्बल चार तास तळ ठाेकला. सर्व खातेप्रमुखांची अाढावा बैठक घेऊन महत्त्वाच्या फायलींवर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. दाेन दिवसांत अत्यावश्यक अशा सर्वच फायली निकाली काढू, असे अाश्वासनही त्यांनी महापाैरांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले.

विधानसभा निवडणुकीची अाचारसंहिता काेणत्याही दिवशी लागू हाेण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर अायुक्तांकडे दाेनशेहून अधिक फायली पडून असल्यामुळे नगरसेवक अस्वस्थ हाेते. या फायली निकाली काढण्यासाठी बुधवारी मनसे, भाजप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अायुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अायुक्तांनी मागील दरवाजाने महापालिका मुख्यालय साेडल्यामुळे संतप्त नगरसेवकांनी ठिय्या अांदाेलन केले. गुरुवारी फायली निकाली काढल्यास अायुक्त कार्यालयाला टाळे ठाेकण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. महापाैर अॅड. यतिन वाघ यांनी अायुक्त पाेंक्षे यांच्याशी चर्चा करून मध्यस्थी केली. त्या वेळी अायुक्तांनी गुरुवारी सकाळीच महापालिकेत सर्व खातेप्रमुखांकडून महत्त्वाच्या फायली मागवून निकाली काढू, असे अाश्वासन दिले होते. त्यानुसार, गुरुवारी सकाळीच अायुक्त महापालिकेत दाखल झाल्या. सर्व खातेप्रमुखांकडून महत्त्वाच्या फायली काेणत्या, त्यांना िकती निधी, प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक अडचणी त्यावरील मार्ग जाणून घेत बहुतांश फायलींवर स्वाक्षऱ्या केल्या. अायुक्तांकडे फायली नेण्यासाठी अधिकाऱ्यांची लगबग सुरू हाेती. दुपारी तीन वाजेपर्यंत अायुक्तांनी तळ ठाेकल्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून बाह्य कामाच्या नावाखाली फिरस्तीवर असणारे अधिकारीही महापालिकेत सकाळच्या सत्रात िदसल्याची प्रतिक्रिया नगरसेवकांकडून व्यक्त हाेत हाेती.
मनसे पदाधिकाऱ्यांचे बाेलणे एेकल्यावर अायुक्त पाेंक्षे यांनी स्पष्टीकरण िदले. मुळात अायुक्तांकडे प्रभार येऊन जेमतेम सहा दिवस झाले अाहेत. काेणत्या महत्त्वाच्या फायल, िनधीची िस्थती याची माहिती खातेप्रमुखांनी दिली असती, तर तातडीने मंजुरी देता अाली असती, असे त्यांनी स्पष्ट केले. मुळात दाेन्ही कार्यभार सांभाळून फायली निकाली काढल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला. येत्या दाेन दिवसांत कार्यारंभ अादेश, तसेच त्यानंतर महत्त्वाचे डाॅकेट्स, प्राकलने मंजूर केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अायुक्तांना धरले धारेवर
महापाैरअॅड. यतिन वाघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अायुक्त पाेंक्षे यांना प्रलंिबत फायलींचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तिजाेरीत खडखडाट असला, तरी अंदाजपत्रकात नगरसेवक निधीतील कामांना मंजुरी दिली अाहे. त्याचप्रमाणे कामांना भविष्यात निधी उपलब्ध हाेणार असून, अाता जरी मंजुरी दिली, तरी लागलीच पैसे द्यावे लागतील अशी परिस्‍ािती वाचणा-या नसल्याकडे लक्ष वेधले. किमान निविदा वा कार्यारंभ अादेश तरी देण्याची मागणी केली. त्यावर अायुक्तांनी दाेन दिवसांत महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचे अाश्वासन दिले.