आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक, पिंपरी-चिंचवडमध्‍ये भाजपचे बिनविरोध महापौर, पिंपरी-चिंचवडमध्‍ये प्रथमच भाजप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महापालिकेत भाजपच्‍या रंजना भानसी यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महापाैरपदासाठी आज पार पाडलेल्‍या निवडणुकीत रंजना भानसी यांनी 62 हा बहुमताचा आकडा सहज पार करीत निवडणुक जिंकली. भाजपचे नाशिकमध्‍ये 66 नगरसेवक निवडून आल्‍याने या निवडणूकीत कोण जिंकणार हे सुरुवातीपासूनच स्‍पष्‍ट होते.
 
महापौर आणि उपमहापौरपदाच्‍या निवडणूकीची केवळ औपचारीकता बाकी होती. उपमहापौरपदी भाजपच्‍या प्रथमेश गीते यांची निवड झाली आहे. काँग्रेसच्या आशा तडवी यांनी महापौरपदाच्‍या निवडणूकीतून आज  माघार घेतल्‍यामूळे भाजपच्‍या रंजना भानसी बिनविरोध निवडून आल्‍या. 
 
पिंपरी चिंचवडच्‍या महापौरपदी भाजपचे नितीन काळजे
नाशिकपाठोपाठ पिंपरी चिंचवडचे महापौरपदही भाजपने अापल्‍या ताब्‍यात घेतले आहे. नितीन काळजे यांची पिंपरी चिंचवडच्‍या महापौरपदी निवड झाली आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून  श्‍याम लांडे यांना उमेदवारी देण्‍यात आली होती. मात्र ऐनवेळी त्‍यांनी निवडणूकीतून माघार घेतल्‍याने काळजे यांची बिनविरोध महापौरपदी निवड झाली. पिंपरी-चिंचवड हा राष्‍ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्‍ला म्‍हणून ओळखला जायचा. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेतील 128 जागांपैकी सर्वाधिक 78 जागा जिंकत भाजपने या बालेकिल्‍ल्‍याला भगदाड पाडले आहे. महापालिकेत भाजपला स्‍पष्‍ट बहुमत असल्‍यामुळे नाशिकप्रमाणे या निवडणूकीचीही फक्‍त औपचारीकताच बाकी होती. 

विजयानंतर प्रतिक्रीया देताना काळजे यांनी संधी दिल्‍याबद्दल मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्‍याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे आभार मानले. पिंपरी-चिंचवड तसेच त्‍याच्‍या आजुबाजूला असलेल्‍या गावांच्‍या विकासासाठी यापुढे काम करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 
 
नाशिकमध्‍ये भाजपने केली विजयोत्‍सवाची तयारी
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ६६ जागा पटकावत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपने महापौर उपमहापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी नंतरच्या विजयोत्सवासाठी ‘स्वामिनारायण ते रामायण’ असा मार्ग निश्चित केला अाहे. मंगळवारी (दि. १४) सकाळी वाजता स्वामिनारायण मंदिरात साधू-महंतांचे दर्शन घेतल्यानंतर केवळ अाैपचारिक असलेली निवडणूक जिंकायची अाणि ‘रामायण’ या महापौर निवासस्थानी जल्लोष करून पक्षाच्या ‘वसंतस्मृती’ या कार्यालयापर्यंत मिरवणुकीद्वारे विजयी जल्लोष करायचा, असे नियोजन पक्षाने केले आहे. 
 
२३ फेब्रुवारीला भाजपची सत्ता आल्यानंतर सव्वा वर्षाच्या कार्यकाळाचा फॉर्म्युला आणून या पदाच्या शर्यतीतील इतरांच्या अपेक्षा आशा जिवंत ठेवल्या गेल्या. महापौर म्हणून रंजना भानसी उपमहापौर म्हणून प्रथमेश गिते यांना उमेदवारीची संधी दिल्यानंतर मंगळवारच्या निवडणुकीत सर्व सोपे असले तरी उगाच कोणता दगाफटका नको म्हणून काटेकोर नियोजन केले गेले होते. त्यानुसार मंडल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन १४ मार्चला सकाळी बरोबर वाजता प्रत्येक नगरसेवक स्वामिनारायण मंदिरातील सभागृहात कसा येईल, याची जबाबदारी दिली गेली. मंडल अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे नगरसेवकांना या ठिकाणी आणावे, असेही स्पष्ट केले होते. 
 
भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक स्वामिनारायण मंदिर येथे आल्यानंतर त्यांची पालकमंत्री गिरीश महाजन, संघटनमंत्री रवी भुसारे, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत ‘ओळख परेड’ होईल. यातील बरेच नगरसेवक नवीन असल्यामुळे त्यांना पक्षशिस्तीविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर मतदानाबाबत व्हिप अर्थातच पक्षादेश बजावला जाईल. त्यानंतर सर्व नगरसेवक बसमधून जाऊन ‘रामायण’च्या प्रवेशद्वारावर उतरतील. त्यानंतर महापौर उपमहापाैरपदाच्या निवडणुकीसाठी रवाना होतील. पावणेबारा वाजेपर्यंत दोन्ही पदांच्या निवडणुका झाल्यानंतर विजयी मिरवणुकीसाठी पुन्हा ‘रामायण’ या निवासस्थानी सर्व एकत्र होतील. 
 
‘रामायण’वरून विजयी मिरवणूक 
महापौर निवासस्थानावरील प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर येथूनच विजयी मिरवणूक ‘वसंतस्मृती’ पक्ष कार्यालयाच्या दिशेने निघेल. उघड्या जीपवर महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक मार्गस्थ होईल. भाजपची अनेक वर्षांनंतर सत्ता आल्यामुळे ढोल-ताशांच्या गजरात आतषबाजीद्वारे मिरवणूक निघेल. प्रामुख्याने भाजपकडून शक्तिप्रदर्शनही मिरवणुकीद्वारे करण्यात येणार आहे. 
 
महापालिकेतील ‘नया गडी-नया राज’ला मंगळवारपासून सुरुवात हाेत अाहे. नव्या महापाैरांसाठी सभागृह चकाचक करण्यात अाले असून, महापाैरांच्या मानाच्या खुर्चीला पाॅलिश केले अाहे. तिच्यावर काेण विराजमान हाेणार, हे सकाळी अाैपचारिकरीत्या ठरेल. 
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, भाजपच्‍या विजयोत्‍सवाचे फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...