आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका अायुक्तांनी केले मनसे नगरसेवकांचे शंकानिरसन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अार्थिकताळमेळ पाहून नगरसेवक निधीतील कामांच्या फायली निकाली काढण्याचा निर्णय घेतल्याचे महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केले अाहे. काेणत्याही फायली रद्द हाेणार नाहीत, असा निर्वाळाही त्यांनीदिला. नवीन बांधकाम दरसूचीनुसार नगरसेवक निधीच्या फायली मंजूर हाेणार नसल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मनसे नगरसेवकांनी महापाैरांच्या नेतृत्वाखाली अायुक्तांची भेट घेतली असता त्यांनी हे स्पष्टीकरण केले.
महापाैर अशाेक मुर्तडक, उपमहापाैर गुरमित बग्गा, स्थायी समिती सभापती अॅड. राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली मनसे नगरसेवकांनी मूलभूत गरजांशी संबंधित फायलींचा तातडीने निपटारा करावा, अशी मागणी केली. त्यावर अायुक्तांनी प्रत्येक विभागाचे निधी नियाेजन पाहून प्राधान्यक्रमाने कामे केली जातील, असे सांगितले. नवीन बांधकाम दरसूचीप्रमाणे फायली तयार करण्याबाबत काेणत्याही सूचना दिल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे अनेक कामांचा मार्ग माेकळा झाला अाहे.