आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानात डेंग्यूच्या अळ्या अाढळल्याने दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - डेंग्यूच्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या अाराेग्य विभागाने सातपूर परिसरात राबविलेल्या तपासणी माेहिमेत कॉलनीतील एका भेटवस्तू विक्री करणाऱ्या

व्यावसायिकाकडे बांबूच्या ट्री प्लान्टसह पाणी असलेल्या धबधब्याच्या प्रतिकृतीत डेंग्यूच्या अळ्या अाढळून अाल्या.

विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, स्वच्छता निरीक्षक राजेश बाेरिचा, माधुरी तांबे, केतन मारू, रवींद्र काळोे, अशाेक उशिरे, चिंतामण पवार अादींच्या पथकाने

दुकानातील अळ्या त्वरित नष्ट केल्या संबंधित व्यावसायिकावर कारवाई करून तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला.

अकरादिवसांत डेंग्यूचे ३३ रुग्ण
थंडीचा कडाका वाढल्यावर डेंग्यूची तीव्रता कमी हाेईल, ही महापालिकेची अाशा फाेल ठरली अाहे. पालिका क्षेत्रात गेल्या ११ दिवसांत डेंग्यूचे ३३ रुग्ण सापडले असून, ८१

संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पालिकेने घेतले अाहेत. दिवसाला तीन अशी सरासरी डेंग्यू रुग्णांची संख्या अाहे.

ते ११ डिसेंबर या कालावधीत डेंग्यूचे ८१ संशयित रुग्ण अाढळले. या सर्वांचे रक्त नमुने तपासणीसाठीजिल्‍हा रुग्णालयात पाठवण्यात अाले. त्यापैकी ६९ रुग्णांचे अहवाल

महापालिकेला प्राप्त झाले असून, ३३ रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले अाहे. अातापर्यंत शहरात ४१५ जणांना डेंग्यूची बाधा झाली असून, डेंग्यूचा धाेका अद्यापही कायम

असल्याचे चित्र अाहे.