आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation News In Marathi, Automobile Sector, Divya Marathi

वाहन क्षेत्र मंदीचा 45 कोटींचा फटका,उत्पादनात घट झाल्यामुळे एलबीटी भरणाही कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ऑटोमोबाइल सेक्टरमधील आर्थिक मंदीचा महापालिकेला चांगलाच फटका बसला असून, एलबीटीमुळे उत्पन्न घटले असताना मोठय़ा कंपन्यांकडून अपेक्षित 45 कोटींच्या करावरही पाणी सोडावे लागणार आहे. याव्यतिरिक्त जवळपास साडेतीनशे छोट्या कंपन्यांकडूनही एलबीटीत घट झाल्यामुळे पालिकेच्या तिजोरीला आर्थिक कसरतीचा सामना करावा लागत आहे.


जकातीऐवजी मे महिन्यापासून एलबीटी लागू झाल्यानंतर महापालिकेला 824 कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, त्यात घट झाल्यामुळे 624 कोटी रुपयांचे सुधारित उत्पन्न निश्चित झाले. 25 मार्चपर्यंत 601 कोटी रुपये जमा झाले असून, जवळपास 25 ते 30 कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे. दरम्यान, पालिकेला करंट अकाउंटमधून दरमहा प्राप्त होणार्‍या बड्या कंपन्यांच्या कर वसुलीत फटका बसला आहे. 31 बड्या कंपन्यांकडून 262 कोटी एलबीटी अपेक्षित होता. प्रत्यक्षात 220 कोटी 90 लाखांचीची वसुली झाली असून, 41 कोटींची तूट निर्माण झाली आहे. ज्या कंपन्यांकडून कर भरणा करण्यात घट झाली, त्यातील बहुतांश ऑटोमोबाइल सेक्टरमधील महत्त्वाच्या कंपन्या असल्याचे उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सांगितले.