आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation News In Marathi, Budget, Property Tax, LBT

महापालिकेचे सुधारित अंदाजपत्रकही कोलमडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एलबीटीमधील घट आणि घरपट्टी, पाणीपट्टीसारख्या करवसुलीत मुख्यालयातील अधिकार्‍यांकडून उशिराने सुरू झालेल्या कारवाईमुळे महापालिकेच्या सुधारित अंदाजपत्रकात 40 कोटींची तूट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 175 कोटींचे कर्जरोखे घेण्याचा प्रस्तावही रद्द झाल्यामुळे मूळ अंदाजपत्रकात जवळपास 250 कोटींची घट होणार आहे.


सन 2013-14 मध्ये महापालिकेचे मूळ अंदाजपत्रक 1554 कोटी रुपये होते. त्यातून कर्जाच्या रूपाने उचलली जाणारी रक्कम रद्द झाल्यामुळे 1303 कोटी रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक झाले. आता त्यातही उत्पन्न घटल्यामुळे 40 कोटींची कमतरता येणार असल्यामुळे 1270 कोटींच्या आसपास सुधारित अंदाजपत्रकाचा आकडा पोहोचेल, असे वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.


कंत्राटदार हवालदिलच
आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम सहा दिवस बाकी असताना कंत्राटदारांची जवळपास 65 कोटी रुपयांची बिले लेखा विभागाकडे पडून आहेत. बिलांसाठी वारंवार तगादा लावला जात असल्यामुळे मध्यंतरी लेखा विभागाने किती उत्पन्न अपेक्षित आहे, अशी विचारणाही कर विभागाकडे केल्याचे समजते.
दरम्यान, 65 कोटींपैकी जवळपास 40 कोटींची बिले मार्चअखेरपर्यंत अदा होतील, असा लेखा विभागाचा अंदाज आहे.


अशी झाली घट
बॉश लिमिटेड (मायको) सातपूर : 14 कोटी 9 लाख 3 हजार
महिंद्रा अँण्ड महिंद्रा लिमिटेड : 8 कोटी 24 लाख 56 हजार 415
करन्सी नोट प्रेस : 6 कोटी 28 लाख 83 हजार 906
सीएट लिमिटेड : 3 कोटी 46 लाख 53 हजार 155
ग्रॅफाईड इंडिया : 3 कोटी 19 लाख 32 हजार 29
स्नायडर इलेक्ट्रिक : 2 कोटी 5 लाख 35 हजार 147