आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation News In Marathi, Commissioner, Sanjay Khandare

महापालिका आयुक्त खंदारे यांच्या बदलीचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिका आयुक्त संजय खंदारे यांची बदली झाली असून, त्यांचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश आदिवासी विकास आयुक्त संजीवकुमार यांना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिल्याचे वृत्त आहे.
लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात खत प्रकल्प खासगीकरण, वाहनतळ ठेका देणे व विद्युत विभागाशी संबंधित निविदा काढल्यामुळे खंदारेंविरोधात राज्य तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेल्या होत्या. जिल्हाधिकार्‍यांकडून राज्य निवडणूक आयोगाने अहवालही मागवला होता.

मध्यंतरी आयुक्त पालिकेसाठी आयोजित प्रशिक्षणाच्या निमित्ताने परदेशात गेल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला होता. दरम्यान, रविवारी संजीवकुमार यांना खंदारे यांची सूत्रे स्वीकारण्याबाबत शासनाचे पत्र आले. संजीवकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कार्यभार स्वीकारण्याबाबत पत्र आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. मात्र, बदलीमागचे कारण वा नियुक्तीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.