आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation News In Marathi, Divya Marathi, Divya Marathi

महापालिकेत पुष्पगुच्छ अन् चहापानासाठी 70 लाख!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - खाबुगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या महापालिकेत एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 या एक वर्षाच्या कालावधीत चहापान, अल्पोपाहार, हार व पुष्पगुच्छांवर तब्बल 70 लाख सहा हजार 43 इतका खर्च झाल्याची बाब पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2011-12 मध्ये पुष्पगुच्छांवर 10 लाख रुपये खर्च झाला होता. त्यानंतरच्या काळात तब्बल 18 लाख 32 हजार इतका खर्च झाला आहे. म्हणजेच वर्षभरातच पुष्पगुच्छांवरील खर्चात तब्बल 8 लाख 32 हजारांइतकी वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पालिकेत सुरू असलेल्या पैशांच्या उधळपट्टीबाबत ‘दिव्य मराठी’त वारंवार पोलखोल होत आहे. काही महिन्यांपूर्वी महासभेत प्रत्येकी 700 रुपयांचा अल्पोपाहार कागदोपत्री दाखविला जात असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले होते. त्यानंतर अडीच वर्षांच्या कालावधीत हार, पुष्पगुच्छ आणि शालींवर पालिकेने 33 लाखांचा खर्च केल्याची माहिती पुढे आली होती. आता पुन्हा एकदा एक वर्षाचा लेखाजोखा पुढे आला आहे. सामाजिक कार्यकर्ते जगबीर सिंग यांनी माहिती अधिकारात वर्षभरातील चहापाणी, नाश्ता, पुष्पगुच्छ यावरील खर्चाचा तपशील मागितला होता. पालिकेच्या उत्तरानुसार वर्षभरात तब्बल 70 लाख 6 हजार 43 इतका खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे.
साडेपाच लाख रुपये जातात तरी कोठे?
चहापान, अल्पोपाहार, हार आणि पुष्पगुच्छांवर केलेल्या 70 लाख सहा हजार खर्चाची महिन्याची सरासरी सुमारे 5 लाख 83 हजार 836 रुपये इतकी होते. पालिकेत दिले जाणारे गुच्छ बघता ते प्रतिनग कमाल 50 रुपयांपर्यंत उपलब्ध होऊ शकतात. शालही 50 रुपयांपर्यंतची दिली जाते.पालिकेत प्रत्येकी 100 शाली व पुष्पगुच्छ दर महिन्याला देण्यात आले असे गृहीत धरले तरीही त्याचा खर्च केवळ 10 हजारांपर्यंत होतो. तसेच चहापान व अल्पोपाहारावर कमाल खर्च एक लाखापर्यंत होतो, असे जरी गृहीत धरले तरीही 5 लाख 83 हजार रुपयांचे समीकरण जुळत नाही इतकी मोठी ‘ढाय’ महापालिकेत महिन्याला मारली जात असल्याचे यावरून स्पष्ट होते.
दौर्‍यांवरील खर्चही मोठा
पालिकेतील कारभार्‍यांनी स्वत:च्या पेटपुजेसार्ठी सामान्य करदात्यांच्या पैशांवरच हात मारल्याचे आकडेवारीतून3 स्पष्ट झाले आहे. कर्जाच्या खाईतील पालिकेला आर्थिक भुर्दंड देण्याचा हा प्रकार आहे. दरवर्षी निघणारे परदेश दौरे व इतर राज्यांमधील प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी जाणारी शिष्टमंडळे यांच्यावर झालेला खर्च अजून किती असेल, याचा अंदाज व्यक्त न केलेलाच बरा. जसबीर सिंग, कार्यकर्ता, आम आदमी पार्टी
‘दिव्य मराठी’मुळे 19 लाखांची बचत
पालिकेत नाश्त्यासाठी प्रत्येकावर तब्बल 700 रुपयांची उधळपट्टी होत असल्याची बाब ‘दिव्य मराठी’ने ऑगस्ट 2013 मध्ये उघडकीस आणली होती. त्यानंतर महासभेत नाश्ताच न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापौरांनी घेतल्याने महिन्याला एक लाख 58 हजार 900 रुपयांची बचत झाली. म्हणजेच नाश्ता न दिल्यामुळे वर्षाकाठी 19 लाख 6 हजार 800 रुपये इतकी बचत झाली आहे.
मार्च 2012 ते एप्रिल 2013 पर्यंतचा खर्च
18,32,826 हार व पुष्पगुच्छ यावरील खर्च
47,67,740 अल्पोपहारावर
झालेला खर्च 4,05,477