आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation News In Marathi, School, Student, Divya Marathi

शिक्षकांच्या इंग्रजी ज्ञानाची आता टेस्ट,दर्जेदार शिक्षणासाठी पालिकेचा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी अध्ययनात मागे पडत असल्याने या शाळेतील पटसंख्येत घट होत आहे. महापालिकेने यावर उपाय योजण्यास सुरुवात केली असून, विद्यार्थ्यांना इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आता नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या इंग्रजी विषयाच्या अध्यापनाची चाचणी घेण्यात येणार आहे.


सर्वसामान्यांच्या मुलांनाही दर्जेदार व कालसंगत शिक्षण मिळावे, यासाठी महापालिका प्रशासन थेट पहिली ते आठवीपर्यंत इंग्रजी शिकविणार्‍या शिक्षकांचीच चाचणी या शैक्षणिक वर्षात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने खासगी शाळांप्रमाणेच सरकारी शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने राज्यभरातील शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण दिले. त्यासाठी सुमारे 15 कोटी रुपये खर्च करण्यात आला. याअंतर्गतच नाशिक महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळे अध्यापनात नेमका काय फरक पडला, याची तपासणी या चाचणीतून घेण्यात येणार आहे.


महापालिका हद्दीत एकूण 128 शाळा आहेत. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणे पालिकेनेही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. शिक्षण मंडळ प्रशासनाने या शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी व गणितात आघाडी घ्यावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शिक्षकांना संगणक, प्रोजेक्टर व लॅपटॉप हाताळता यावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. यासाठी प्रशासन अधिकारी किरण कुवर यांनी पेपरलेस विभाग करण्यासाठी थेट मुख्याध्यापकांना इ-मेलवरून परिपत्रके पाठविण्यास सुरुवात केली आहे.


दहा दिवसांचे मिळाले प्रशिक्षण : राज्य शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यभरात राबविलेल्या इंग्रजी अध्यापनाच्या प्रशिक्षण कार्यक्रमानुसार नाशिकमध्ये जानेवारी व फेब्रुवारीत दहा दिवसांचे प्रशिक्षण ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने झाले. यात इंग्रजी संभाषण कौशल्य, प्रात्यक्षिक व संवादातून हसत-खेळत इंग्रजीचे अध्यापन कसे करावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. नाशिकमध्ये पालिकेच्या सुमारे शंभर शिक्षकांना हे प्रशिक्षण एका मास्टर ट्रेनरद्वारे देण्यात आले.
संगणकाच्या ज्ञानाची उजळणी करणार : सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांना एमएससीआयटीचे प्रशिक्षण दिले गेले. देण्यात आले आहे. त्यामुळे संगणकाच्या ज्ञानाचीही उजळणी घेण्यात येणार आहे.


शिक्षकांना दोनदा संधी
इंग्रजी अध्ययनात विद्यार्थ्यांची र्शेणी अधिक वाढविण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात महापालिका शाळांमधील इंग्रजीचे अध्यापन करणार्‍या शिक्षकांची चाचणी घेण्यात येणार आहे. यात शिक्षकांना दोन संधी देण्यात येणार आहे. अध्यापनात सुधारणा न झाल्यास त्यांना मेमो देण्यात येईल. किरण कुवर, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ