आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation News In Marathi, Ward Committee,Divya Marathi

सभापती निवड: पाच प्रभागांत दुरंगी लढती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदांसाठी 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. पाच प्रभागांत दुरंगी सामना असून, नाशिक पूर्व प्रभागात मात्र एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत.लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रभाग समितीची निवडणूक जाहीर करण्याची सत्ताधारी मनसे-भाजपची खेळी होती. जेणेकरून महाआघाडी वा महायुती होणार नाही व पक्षाला सहज विजय मिळेल, असे गणित होते. त्याप्रमाणेच निवडणुकीच्या आदल्या दिवशी घडामोडीही घडल्या. सिडकोत शिवसेना व मनसे असा दोघांमध्येच सामना आहे. नाशिक पश्चिममध्ये भाजप उमेदवाराचा डमी अर्ज असून, येथे मनसे व काँग्रेसमध्ये दुरंगी लढत असेल.

नाशिकरोडमध्ये शिवसेना-मनसे व राष्ट्रवादीत लढत असेल. सातपूरमध्ये मनसे व शिवसेनापुरस्कृत उमेदवार, अशी लढत होईल. पंचवटीत मनसे, भाजप व राष्ट्रवादीचे उमेदवार असले, तरी येथे मनसे माघार घेण्याचीच शक्यता असल्यामुळे दुरंगी सामना होईल. नाशिक पूर्व प्रभागात मनसे, भाजप, काँग्रेस व अपक्ष चौघांचे अर्ज आहेत. यात अपक्षांची साथ राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता अधिक आहे. मनसे व भाजपही एक माघार घेणार असल्यामुळे अंतिमत: दुरंगीच लढत होईल.


यांच्यात होणार लढती..
सिडको : अनिल मटाले (मनसे), उत्तम दोंदे (शिवसेना)
नाशिक पूर्व : अर्चना थोरात (मनसे), कुणाल वाघ ( भाजप), रशिदा शेख (अपक्ष), समीना मेमन (काँग्रेस)
नाशिकरोड : नीलेश शेलार (मनसे), कोमल मेहरोलिया (शिवसेना), शोभा आवारे (राष्ट्रवादी )
सातपूर : सुरेखा नागरे (मनसे), नंदिनी जाधव (शिवसेना पुरस्कृत)
पंचवटी : परशराम वाघेरे (भाजप), शालिनी पवार (भाजप), रुची कुंभारकर (मनसे), सुनीता शिंदे (राष्ट्रवादी)