आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Satpur Ward Cleaning Issue

LIVE रिपोर्ट: अस्वच्छ कारभार; काम केले काय अन् नाही काय, विचारतो कोण?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर- सातपूर विभागात स्वच्छता करण्यासाठी 116 कर्मचारी असले तरी प्रत्यक्षात मात्र 90 ते 95 कर्मचारीच कामावर असतात. कर्मचारी आणि त्यांचे निरीक्षक यांच्या कामाचा सकाळी साडेसहा वाजेपासून प्रतिनिधीने घेतलेल्या आढाव्यात परिसरच नव्हे तर कारभारही अस्वच्छच असल्याचे आढळले.

सातपूर कॉलनी येथील हजेरी शेडजवळ सकाळी हजेरीसाठी एक-एक कर्मचारी येत होता. मुकादम राजेंद्र नेटावटे हे हजेरी रजिस्टरमध्ये कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या घेत होते.

हा प्रतिनिधी या कर्मचार्‍यांच्या कामावर नजर ठेवून असल्याचे लक्षात येताच कर्मचार्‍यांनी विभागीय स्वच्छता निरीक्षकांना कल्पना दिली. त्यांनीही गंगापूरकडे धाव घेऊन कर्मचार्‍यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. मौन बाळगलेल्या निरीक्षकांनी र्शमिकनगरला रस्त्यावर कचरा टाकणार्‍या महिलांना ताकीद दिली. सकाळी 10 वाजता पुन्हा सातपूर कॉलनीतील हजेरी शेडवर प्रतिनिधी जाताच त्यांच्या मागे विभागीय निरीक्षकही आले.

शहर स्वच्छतेचे अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या महापालिकेतील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अधिकार्‍यांचे सफाई कर्मचार्‍यांकडे होणारे दुर्लक्षच त्याचे प्रमुख कारण असल्याने ‘कामावर आले काय आणि नाही काय’ असेच काम होत असल्याचे दिसले. ‘दिव्य मराठी’ने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक बाबी उघड झाल्या.

गणवेशाचे वावडे
सातपूर प्रभागात अनेक ठिकाणी कर्मचारी महापालिकेने दिलेल्या गणवेशात दिसलेच नाहीत. असेच काही कर्मचारी टी शर्ट परिधान करूनच परिसरात साफ-सफाई करीत होता. आमच्या प्रतिनिधीने त्याचे छायाचित्र घेताच दोन्ही कर्मचार्‍यांनी घर गाठून खाकी गणवेश परिधान करूनच कामावर हजेरी लावली.

प्रामुख्याने आढळलेल्या बाबी
>स्वच्छ असलेल्या जागेवर एकाच वेळी चार महिला स्वच्छतेचे कर्तव्य बजावत असल्याचे दिसले. कुणीतरी आपला पाठलाग करतोय याची माहिती मिळताच मग स्वच्छता निरीक्षकाने नंतर संबंधित महिला कर्मचार्‍यांना फैलावर घेतले.
>शेड शेजारीच असलेल्या सातपूर कॉलनी भाजी मार्केटजवळ एक कर्मचारी गणवेश परिधान न करताच स्वच्छता करीत होता. सावरकरनगर परिसरात याच पध्दतीने टी शर्ट परिधान केलेला कर्मचारी सफाई करत होता.
>गंगापूर गाव येथे कामाच्या सोयीने मुकादम असलेला कर्मचारी टी शर्ट परिधान करून स्वच्छता निरीक्षकांसमवेत उभा होता.

सातपूर विभागातील एकूण कर्मचारी
>विभागीय स्वच्छता निरीक्षक- 1, स्वच्छता निरीक्षक- 4, कामाच्या सोयीने मुकादम- 12, कामगार- 116.
>दररोज वेगवेगळ्या कारणाने 7 ते 8 कर्मचारी असतात गैरहजर.
>विभागीय कार्यालयाच्या अन्य विभागात 17 सफाई कर्मचारी.