आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Should Be Speak On Godavari Polution

गोदावरी प्रदूषणाबाबत नाशिक महापालिकेने खुलासा करावा - उच्च न्यायालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - चोपडा लॉन्स परिसरातील फुटके चेंबर्स आणि तपोवन मलजलशुद्धिकरण प्रकल्पाच्या बाहेरील परिस्थिती जाणून उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला असून, येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत नाशिक महापालिकेने याबाबतचा खुलासा करावा असे आदेश न्यायालयाने शुक्रवारी दिले.

गोदावरी प्रदूषणाबाबत राजेश पंडित यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. शहरातील गटारी आजही मलजल गोदापात्रात सोडले जात असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताच न्यायालयाने खुलासा पालिकेकडून मागवला. तसेच कुंभमेळ्यात नदी आणखी प्रदूषित होऊ नये, यासाठी नेरीला उपाय सुचवण्यास सांगण्यात आले आहे.

दसर्‍याच्या दिवशी नदीवर सर्रास गाड्या धुतल्या गेल्या आणि आजही तो प्रकार सुरू असून, हा गंभीर विषय असल्याबाबत पोलिसांनी उत्तर द्यावे, असे देखील न्यायालयाने सुनावताच प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही जणांवर कारवाई केल्याची आमची माहिती असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले.