आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकराेड स्थानकालगतचे अतिक्रमण साफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड बसस्थानकावरील गाळे पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन माेहिमेत जमीनदाेस्त करण्यात अाले. - Divya Marathi
नाशिकराेड बसस्थानकावरील गाळे पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन माेहिमेत जमीनदाेस्त करण्यात अाले.
नाशिकराेड - भूतपूर्व नाशिकराेड-देवळाली नगरपालिकेच्या कार्यकाळात सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी नाशिकराेड बसस्थानकाच्या अावारात बांधलेले अधिकृत १६ अनधिकृत १० असे २६ गाळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने साेमवारी सकाळी कडेकाेट पाेलिस बंदाेबस्तात जेसीबीद्वारे अवघ्या १५ मिनिटांत जमीनदाेस्त केले. महापालिकेने गाळेधारकांना नाेटीस बजावल्यानंतर सकाळी कारवाईला सुरुवात झाली. गाळेधारकांकडून कारवाईला कुठलाच विराेध करण्यात अाला नाही. जवळपास दहा वर्षांपासूनचा गाळेधारक महापालिका यांच्यातील वाद सोमवारी संपुष्टात अाला.

नाशिकराेड बसस्थानकावर भूतपूर्व नगरपालिकेच्या कार्यकाळात १६ गाळ्यांचे शाॅपिंग सेंटर उभारण्यात अाले हाेते. नाममात्र भाडेतत्त्वावर ड्रायफ्रूट्स, चिवडा, माेबाइल, कपडे, चहा, पान दुकानासह विविध विक्रेते येथे वर्षानुवर्षे व्यवसाय करीत हाेते. अधिकृत गाळ्यांच्या दाेन्ही बाजूने पुढे मागे अनधिकृत दुकानांचा माेठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने बसला स्थानकातून बाहेर पडताना अडथळा हाेत हाेता. या वळणावर २४ तास वाहतूक काेंडी हाेत हाेती. पालिकेचे उपायुक्त राेहिदास बहिरम, अतिक्रमण उपायुक्त साेमनाथ वाडेकर, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक नारायणराव न्याहळदे, उपअभियंता नीलेश साळी, विभागीय अधिकारी कुसुम ठाकरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात अाली.

पालिकेने गाळेधारकांना २४ तासांच्या अात गाळे रिकामे करण्याची नाेटीस बजावली हाेती. नुकसान दंडात्मक कारवाईच्या भीतीमुळे गाळेधारकांनी रविवारी रात्रीच गाळे रिकामे केले हाेते. त्यामुळे सोमवारी गाळेधारक पालिकेदरम्यान संघर्ष झाला नाही. निकाल महापालिकेच्या बाजूने महापालिकेविराेधातगाळेधारकांनी उच्च न्यायालयात अाव्हान दिले हाेते. दहा वर्षांपूर्वीच महापालिकेच्या बाजूने निकाल लागला हाेता. तत्कालीन अायुक्त सानप यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाला गाळे हटविण्याचे निर्देश दिल्यानंतरही कारवाई झाली नाही. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नाेटीस बजावल्यानंतर गाळेधारकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पुन्हा पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सोमवारी तत्काळ कारवाई झाली.
माेकळ्या जागेवर काँक्रिटीकरण
बस स्थानकाच्याअावारातील पाडण्यात अालेल्या गाळ्यांच्या माेकळ्या जागेवर काँक्रिटीकरण केले जाणार अाहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या धर्तीवर रिक्षा रांगेत उभ्या राहण्याची व्यवस्था केली जाणार अाहे. रेल्वेस्थानकातून प्रवासी बाहेर पडल्यानंतर फुटपाथवर उभे राहून रिक्षात बसणे प्रवाशांना शक्य हाेणार अाहे. पहिली पर्वणी ११ दिवसांवर असल्याने सध्या काँक्रिटीकरण केले जाणार असून, सिंहस्थानंतर उर्वरित काम हाेईल. नीलेश साळी, उपअभियंता, बांधकाम विभाग
रात्री 2 वाजेपर्यंत कुंभमेळ्याच्या बंदाेबस्ताची तालीम
नाशिकराेड बसस्थानकावरील गाळे हटविण्याची कारवाई साेमवारी सकाळी 6 वाजता करण्याचा निर्णय झाल्यानंतर महापालिकेच्या अितक्रमण निर्मूलन विभागाचे पथक पालिका अधिकारी वेळेत बसस्थानक परिसरात उपस्थित हाेते. मात्र, रविवारी रात्री 2 वाजेपर्यंत पाेलिस अायुक्तांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बंदाेबस्ताची रंगीत तालीम सुरू असल्याने पाेलिस पथक सकाळी 9 वाजेच्या सुमारास या ठिकाणी दाखल झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत २६ गाळे जमीनदाेस्त करण्यात अाले. या कारवाईप्रसंगी गाळेधारकांकडून कुठल्याही प्रकारचा विराेध अतिक्रमण निर्मूलन पथकाला झाला नाही.
०५० पोलिस कर्मचारी
००७ पाेलिस उपनिरीक्षक
००४ पाेलिस निरीक्षक
००४ जेसीबी
१०० पालिकेचे कर्मचारी