आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिकाऱ्यांच्या मुलांना शालेय प्रवाहात आणणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात भिकाऱ्यांच्या सहा वर्षांपुढील मुलांनाही शालेय प्रवाहात आणण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे. जुलै रोजी होणाऱ्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात या मुलांचाही शाेध घेतला जाणार आहे. जवळपास पाच हजार प्रगणकांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवन साेनवणे यांनी दिली.

शिक्षणाच्या प्रवाहापासून एकही वदि्यार्थी वंचित राहू नये, यासाठी केंद्र शासनाने शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण देण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार शाळा सुरू झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनी पटावर येणारी संख्या त्यानंतर घरोघरी जाऊन ज्यांनी प्रवेश घेतलेला नाही, त्यांचा शोध घेतला जाणार आहे. जुलै रोजी महापालिका क्षेत्रात ही मोहीम राबवली जाणार असून, शहरातील तीन लाख ९० हजार मिळकती तर ५० हजार स्लम तथा झाेपडपट्टी परिसरात पाच हजार प्रगणकांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी २५६ पर्यवेक्षक १५ केंद्रप्रमुखही असणार आहे. माेहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यानिमित्ताने भिकाऱ्यांच्या मुलांनाही शालेय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होईल. यानिमित्ताने अशी मुले किती याचेही सर्वेक्षण होणार आहे.
व्हॉट‌्सअॅपवर कळवा शाळाबाह्य मुले
या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग असावा जेणेकरून काेणतेही बालक शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी व्हॉट‌्सअॅपवर शाळाबाह्य मुलांची माहिती पाठवण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त साेनवणे यांनी केले आहे. त्यासाठी १५ नियंत्रकांचे क्रमांक लवकरच जाहीर केले जाणार असून, सहाही विभागनिहाय नेमलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी क्रमांक दिले जातील.
येथे घेणार शोध
घरे, वस्ती, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, स्थलांतरित कुटुंबे, झोपड्या, फुटपाथ, सिग्नल, मोठी बांधकामे, दगडखाणी, आठवडेबाजाराची ठिकाणे येथे शोध घेऊन मुलांना शालेय प्रवाहात आणले जाईल. सर्वेक्षणादरम्यान प्रत्येक मुलाच्या बोटाला शाई लावली जाणार आहे. जेणेकरून कोणीही या सर्वेक्षणातून सुटणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...