आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Water Cutting Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेच्या पाण्यात कपात? पाण्याचे दीडशे कोटी थकल्याची नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेला करारापेक्षा अधिक पाणी दिले जात असून, या ‘क्षेत्र पुनस्र्थापने’चे दीडशे कोटी रुपये थकल्याने आगामी काळात पालिकेच्या पाण्यात कपात करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. तशी नोटीसही पालिकेला पाठवल्याचे या विभागाचे म्हणणे असून, पालिका प्रशासनाने मात्र पाटबंधारे विभागाची मागणी चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.
1995 साली झालेल्या करारानुसार महापालिकेस 2800 दशलक्ष घनफूट पाणी देण्याचे ठरले होते. त्यापोटी पाटबंधारे विभागाकडून महापालिकेस पाणीपट्टी आकारण्यात येते. दर दोन महिन्यांनी महापालिका त्याचा नियमित भरणा पाटबंधारे विभागास करते. सध्या महापालिकेस 5 हजार 111 दशलक्ष घनफूट म्हणजेच जवळपास दीड हजार हेक्टर सिंचन क्षेत्राचे अधिक पाणी दिले जात आहे. या अतिरिक्त पाण्यामुळे बाधित क्षेत्रानुसार क्षेत्र पुनस्र्थापना आणि पाणी पुनर्वापराचे पैसे देणे अनिवार्य आहे. ही देय रक्कम महापालिकेकडून येणे बाकी असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले आहे. 2800 दशलक्ष घनफूट पाणीसाठय़ाव्यतिरिक्त वापरण्यात येणार्‍या अधिक पाण्याचेच पैसे आकारावे अशी महापालिकेची भूमिका आहे. परंतु तशी तरतूद नसल्यामुळे संपूर्ण 5 हजार 111 दशलक्ष घनफूट पाण्याची पुनस्र्थापनेची रक्कम महापालिकेने भरणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार शासन स्तरावरच हा निर्णय होणे आवश्यक असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.
ही रक्कम तत्काळ भरणे आवश्यक असून, तसे न झाल्यास टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्यात येणार आहे. तशी नोटीसही महापालिकेस देण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ. ना. म्हस्के यांनी सांगितले.