आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation,Latest News In Divya Marathi

वडाळागावच्या रहिवाशांना मिळणार मुबलक पाणी; 20 दशलक्ष लिटर क्षमतेच्या दोन जलकुंभांचे काम पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्या पंधरा वर्षांपासून पाणीटंचाई व कमी दाबाने होणा-या पाणीपुरवठ्याच्या समस्येचा सामना करत असलेल्या डीजीपीनगर व वडाळागाव परिसरातील रहिवाशांना आता लवकरच मुबलक पाणी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 38 मधील अशोकामार्ग, वडाळागाव व डीजीपीनगर या भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने या भागात 20 दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ उभारले असून, 15 ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डीजीपीनगर, वडाळागाव, अशोकामार्ग, पखालरोड, टागोरनगर या भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याची समस्या होती. नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या भागात वेगाने नागरीकरण होत असल्याने लोकसंख्याही वाढत आहे. पाणीपुरवठ्याची भविष्यातील गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने पखालरोड परिसरात 20 दशलक्ष लिटर व वडाळागाव परिसरात 20 दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ उभारण्यात आले आहे. त्यातील पखालरोडवरील जलकुंभावरून येत्या 30 जुलैपासून, तर वडाळागाव येथील जलकुंभावरून 15 ऑगस्टपासून पाणीपुरवठा सुरू होणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी मुख्य जलवाहिनी व अंतर्गत जलवाहिन्यांची कामेही पूर्ण झाली आहेत.
नागरिकांना मिळणार मुबलक पाणी...
वडाळागाव, डीजीपीनगर, अशोकामार्ग परिसरातील वाढत्या लोकसंख्येला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी दोन जलकुंभांची उभारणी करण्यात आली आहे. या जलकुंभांवरून काही दिवसांत पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा होईल.- सतीश कुलकर्णी, उपमहापौर