आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation,latest News In Divya Marathi

आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी ओबीसी प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी नाशिक महापालिकेचे महापौरपद इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित झाले आहे. परिणामी, मूळ ओबीसी प्रवर्गातील 33 नगरसेवकांबरोबरच महापौरपदाच्या खुर्चीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातून लढलेल्या इतर मागासवर्गीय नगरसेवकांनाही शर्यतीत सहभागी होता येईल.
विद्यमान महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असताना अ‍ॅड. यतिन वाघ यांना या पदासाठी संधी मिळाली होती. शनिवारी (दि. 16) मुंबईत नगररचना विभागाने काढलेल्या आरक्षण सोडतीत महापौरपद पुढील अडीच वर्षांकरिता इतर मागासप्रवर्गासाठी खुले झाले. यापूर्वी सर्वसाधारण तसेच अनुसूचित जातीसाठी महापौरपद आरक्षित होते. मात्र, अनुसूचित जमातीसाठी महापौरपद आरक्षित झालेले नव्हते. या सोडतीपूर्वी याच प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित होईल, अशी भाकितेही वर्तवण्यात आली होती. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील इच्छुक देव पाण्यात बुडवून बसले होते. शनिवारी ओबीसीसाठी महापौरपद आरक्षित झाल्यावर निम्म्या नगरसेवकांच्या आशांना धुमारे फुटले आहेत.
पक्षाप्रमाणे बदलणार रणनीती : ओबीसी प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित असले तरी येथे सर्वसाधारण गटातून लढणाºया ओबीसी नगरसेवकांना महापौरपदाची संधी असेल. ओबीसीनिहाय सर्वाधिक इच्छुक मनसेकडे, त्यानंतर राष्टÑवादी, कॉँग्रेस व भाजपकडे आहेत. सर्वात कमी म्हणजे चार नगरसेवक शिवसेनेचे आहेत. मनसेने ओबीसी उमेदवाराकडे गतवेळी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असलेले महापौरपद सोपवले होते. त्याची भरपाई म्हणून यंदा ही खुर्ची सर्वसाधारण गटातील, परंतु मूळ ओबीसी नगरसेवकाकडे जाऊ शकते.
प्रमाणपत्र असेल तर यांनाही संधी
मूळ ओबीसी प्रवर्गातील मात्र सर्वसाधारण गटातून लढणारे शिवसेनेचे अजय बोरस्ते, सचिन मराठे, विलास शिंदे, विनायक पांडे, सूर्यकांत लवटे, अ‍ॅड. शिवाजी सहाणे, डी. जी. सूर्यवंशी, मनसेकडून शशिकांत जाधव, अशोक सातभाई, अशोक मुर्तडक, सुरेखा भोसले, रमेश धोंगडे, सुजाता डेरे, भाजपकडून दामोधर मानकर, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, राष्टÑवादीकडून विनायक खैरे, छाया ठाकरे, विक्रांत मते, कॉँग्रेसकडून उद्धव निमसे व शाहू खैरे.