आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढीगभर फायली मार्गी लावणार तरी कशा?, महापालिकेत रात्र थोडी सोंगे फार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेत रात्र थोडी, सोंगे फार अशी अवस्था... फाइल काढण्यासाठी आले तर लोकांची भेट घेण्यासाठी रीघ लागते. त्यांना भेटले नाही तर आंदोलन होते. भेटण्यात वेळ गेला की फायली काढत नाही, अशी बोंब उठते. ढीगभर फायली मी कशा काढणार, अशा शब्दांत महापालिकेच्या प्रभारी आयुक्त सोनाली पोंक्षे- वायंगणकर यांनी आपली अस्वस्थता माध्यमांसमोर प्रकट गेली. प्रभार घेऊन सहाच दिवस झाले. मी शेवटी मनुष्यच आहे, अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे नगरसेवक निधीतील विविध विकासकामांच्या फायली मंजूर करण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे.
त्यातच प्रभारीपदाची सूत्रे असलेल्या सोनाली पोंक्षे यांनी फायली निकाली न काढल्यास आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी दिला. त्यासंदर्भात जाधव व आयुक्त यांची रीतसर बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रभारी आयुक्त पोंक्षे यांनी आपली याबाबत होणारी घुसमट मांडली.
त्या म्हणाल्या की, मुळात मला हा पदभार स्वीकारून जेमतेम सहा ते आठ दिवस झाले आहेत. मधील सुटीचे दिवस किती हे माहितीच आहे. पाच महिन्यांपासून आयुक्त नसल्यामुळे फायलींचे ढीग साचले. हवे तर आतील अँटीचेंबरमध्ये गेल्यास तुम्हाला फायलींचे ढीगच्या ढीग दिसतील. त्यात आर्थिक स्थितीमुळे फायलींचा प्राधान्यक्रम ठरवून त्या निकाली काढल्या जात आहेत. सिंहस्थ कुंभमेळा व अन्य विकासकामांच्या फायली सोमवारी मी िनकाली काढल्याच ना, आता प्रत्येक फाइल डोळे बंद करून मंजूर होणार नाही. नेमके या फायलींमध्ये काय आहे, याचे अवलोकन बारकाईने तर करावेच लागेल. अशा परिस्थितीत शक्य तितक्या फायली निकाली काढत आहे.
सभागृहनेत्यांबरोबरच सर्वांचीच चुप्पी
आयुक्तांकडे विकासकामांच्या फायली पडून आहेत. त्यांच्याकडून चुकीची वागणूक मिळते, अशा तक्रारी करणारे नगरसेवक प्रत्यक्षात मंगळवारी दुपारी आयुक्तांकडे फिरकलेच नाहीत. सभागृहनेते शशिकांत जाधव यांच्याबरोबर निवडक नगरसेवक होते. गटनेत्यांना सोबत घेऊन ते आयुक्तांना भेटणार होते. प्रत्यक्षात ऐनवेळी सर्वांची तोंडे विरोधात असल्याचे व सभागृहनेत्यांसह सर्वांनीच चुप्पी साधल्याचे दिसले.
फायली सफाईच्या की विकासकामांच्या...
सभागृहनेत्यांनी आयुक्तांसमोर दोन दिवसांत फायली निकाली काढणार असल्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. प्रत्यक्षात आयुक्तांनी लगेचच मी कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे सांगितल्यावर जाधव हे क्षणभर गोंधळले. त्यात त्यांनी शाळांमधील सफाईची कामे बचतगटांच्या माध्यमातून देण्यासंदर्भात फायली निकाली काढल्या जातील, असे सांगितले. त्यावर माध्यम प्रतिनिधींना नेमका विषय सफाईचा की विकासकामांचा, असा प्रश्न विचारला.