आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिग्रहणाशिवाय विकासकामांचा धडाका, कुंभमेळ्यातील अडचणी वाढल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साधुग्रामसाठीजागा अधिग्रहित झाली नसतानाही महापालिकेकडून कुंभमेळ्याच्या कामांचा धडाकेबाज शुभारंभ करण्यात आला. राजकीय वर्चस्व दाखवण्यासाठी इच्छुक नगरसेवकाने हा खटाटोप केल्याचे स्पष्ट झाले आहे. जागा ताब्यात नसताना हा सारा खटाटोप अनाकलनीय असल्याचा आरोप केला जात आहे.

तपोवन परिसरात साधुग्रामसाठी १६३ एकर जागेची आवश्यकता आहे. ही जागा केवळ कागदोपत्री उपलब्ध आहे. प्रशासनाकडून जागा ताब्यात घेण्यासाठी अद्यापही शेतकऱ्यांची मनधरणी सुरू आहे. मात्र आचारसंहिता लागण्याच्या आत इच्छुकांकडून उद‌्घाटनांसाठी खटाटोप सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तात्पुरत्या स्वरूपात जागा ताब्यात घेता येत नाही. जागा देण्यास अद्याप शेतकऱ्यांचा विरोध आहे. केवळ चांगल्या कामांमध्ये विघ्न नको म्हणून शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला नसल्याचेही काही शेतक-यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे पंचवटी विभाग प्रमुख देवांग जानी यांनीदेखील विकासकामांच्या शुभारंभाबद्दल आश्चर्य व्यक्त करत ठेकेदारांना निश्चित करून कार्यक्रमाची रूपरेषा आखली असल्याची टीका केली. कुंभमेळा ११ महिन्यांवर येऊन ठेपला असताना अद्याप अपेक्षित कामे झालेली नाहीत. केवळ भरघोस निधीची अपेक्षा करत अच्छे दिन येतील याची सत्ताधारी वाट पाहात आहेत. महापौरांचा कार्यकाळ संपत आला तरी अद्याप ब्लू प्रिंट तयार नसल्याचे जानी यांनी पत्रकात म्हटले आहे.
साधुग्राम रखडण्याची चिन्हे
तपोवनातीलसाधुग्राम रखडण्याची चिन्हे आहेत. केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत जागा ताब्यात नसताना कामांचा शुभारंभ करण्यात आला असल्याने साधुग्रामचे काम रखडण्याची भीती निर्माण झाली आहे.