आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उदयपूरची वारी अन् दुस-या घरोब्याची तयारी, महापौर निवडणुकीसाठी मनसे-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तयारीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भाजपने महापौर पदाच्या निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करताना शिवसेनेला सोबत घेण्याचा धरलेला आग्रह लक्षात घेता, मनसेने एकीकडे नगरसेवकांना उदयपूरकडे पाठविण्याबरोबरच दुसरीकडे राष्ट्रवादीची मदत घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते. काँग्रेसला शह देण्यासाठी मनसेसोबतच्या तडजोडी राष्ट्रवादीस उपयुक्त ठरणार असल्याने मनसे व राष्ट्रवादीचा घरोबा होतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वेळी महापौरपदासाठी शिवसेनेने अपक्षांच्या मदतीने जोरदार हालचाली केल्या होत्या. राष्ट्रवादीही त्यावेळी मनसेच्या विरोधात होती, मात्र राज ठाकरे यांनी थेट शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यावर अचानक राष्ट्रवादीने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यातून शिवसेना, अपक्षांपासून तर काँग्रेसपर्यंत सर्वांच्या रणनीती अयशस्वी ठरल्या. यंदा महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेला विधानसभेच्या पार्श्वभूमीवर युतीत सामील करून घेण्याची अट घातली आहे. त्यामुळे मनसेपुढील अडचणी वाढल्या असून, विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत मनसेचा महापौर होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ऐनवेळी भाजपने दगा दिला तर, राष्ट्रवादीची गतवेळेप्रमाणे मदत घेण्याचा प्रयत्न होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शरद पवार व राज यांचे निकटचे संबंध लक्षात घेता तसे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यनिमित्ताने मनसेकडून भाजपवर दबाव निर्माण केला जाईल. यातून सेनेच्या नादात सत्तेसह उपमहापौरपद जाईल, असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे काँग्रेसलाही धक्का देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहील.

काँग्रेस नगरसेवक आज जाणार सापुता-याला...
प्रारंभी दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक एकत्र सहलीला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवकांनी गणेशोत्सवातील कार्यक्रमांचे कारण देऊन सहल रद्द केली. त्यानंतर रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास काँग्रेसचे नगरसेवक सापुता-याकडे रवाना होतील, असे सांगण्यात आले.