आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation's Two Crores Cheque Bounce

पालिकेच्या सहा विभागांत दोन कोटीचे चेक बाउन्स‌्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या तिजोरीत भर घालण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी करांचा भरणा वाढावा यासाठी विविध स्वरूपाच्या सूचना नागरिकांना दिल्या जात अाहेत. याच उद्देशाने या करांचा भरणा करण्यासाठी मिळकतधारकांचे धनादेशही स्वीकारण्यात अाले. मात्र, या करांमधील अनेक धनादेश बँकेत वटलेच नसल्यामुळे महापालिकेला यंदा सुमारे दोन कोटींचा आर्थिक भुर्दंड बसल्याचे समोर आले आहे.

महापालिकेचा आर्थिक भार सांभाळणाऱ्या घरपट्टी, पाणीपट्टी विभागातून दरवर्षी काही काेटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त हाेत असते. जकात बंद झाल्यानंतर महापालिका घरपट्टी, पाणीपट्टीपासून येणाऱ्या महसुलावरच अवलंबून आहे. महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच वेळेवर कर भरता यावा, यासाठी महापालिकेच्या वतीने ऑनलाइन सुविधादेखील उपलब्ध करण्यात आलेली आहे. वर्षाच्या आत भरल्यास दंडापासून वाचविण्यासाठी अनेकांकडून धनादेशाद्वारे या कराचा भरणा केला जात अाहे. तसेच महापालिकेच्या वतीनेही शंभर टक्के भरणा दाखविण्याच्या नादात अशा थकबाकीधारकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. धनादेशाद्वारे भरणा करणाऱ्यांपैकीचे सुमारे दोन कोटीचे धनादेश वटले नाही. पूर्व विभागातील जगप्रसिद्ध एका खासगी रुग्णालयाची दीड लाख रकमेचा, तर एका मोठ्या राजकीय नेत्याचे एक लाखाचे धनादेश वटले नसल्याचेही समोर आले आहे. विभागीय स्तरावर अशा मिळकतधारकांवर कारवाई करण्याचे अधिकार असतानाही मात्र याकडे दुर्लक्ष केले जात अाहे.

महापालिकेकडे ३१ मार्चच्या आत घरपट्टी पाणीपट्टी भरल्यास दर महिन्याला टक्के असा वर्षाला एकूण २४ टक्के दंड भरावा लागतो. मात्र, शहरातील उद्योजक, राजकीय नेते नागरिकांनी धनादेशद्वारे कर भरून या दंडाची रक्कम वाचविण्याचा नवीन प्रयोग सुरू केला आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने हे धनादेश बँकेत टाकल्यानंतर मिळकतधारकांच्या खात्यात पैसे नसल्याने ते बाउन्स‌् हाेतात. अशा वेळी नागरिकांना २४ टक्के दंडाची रक्कम भरता फक्त धनादेश वटले नाही, म्हणून फक्त बँकेचा शंभर ते दीडशे रुपये दंड भरावा लागतो.
महापालिकेत घरपट्टी, पाणीपट्टी कराचे धनादेश दिलेल्या मुदतीच्या आत भरल्यास महापालिका संबंधितांविरोधात १३८ कलमामार्फत गुन्हा दाखल करू शकते. मात्र, कर भरण्यासाठी देण्यात अालेली महिनाभराची मुदत संपूनही अद्याप अशा एकाही थकबाकीधारकांवर महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची अशी कारवाई झालेली नाही, तर अशा नागरिकांची माहितीदेखील महापालिकेकडून लपवली जात असल्याचे समोर आले आहे. याचबराेबर काही मिळकतधारकांनी िदलेले धनादेशही वटले नसल्याचा प्रकार समाेर अाला अाहे. पािलकेच्या वतीने करभरणा करण्यासाठी िवविध सुविधा देण्यात अाल्या अाहेत.

धनादेश वटल्यास कारवाई...
महापालिकेच्या घरपट्टी पाणीपट्टी विभागाच्या भरण्यातील धनादेश वटले गेले नाही, तर संबंधित मिळकतधारकांवर दंडाची कारवाई केली जाते. महेंद्रपगारे, विभागीय अधिकारी, सातपूर विभाग

बँकेचा दंड भरावा लागतो
मार्चएण्डपर्यंत विभागातील जवळपास ८० टक्के वसुली झाली आहे. यात काही जणांनी चेकने भरणा केलेला आहे. बाउन्स‌् झालेल्या चेकचा दंड बँकेत भरावा लागतो. जयश्रीसोनवणे, विभागीयअधिकारी, पश्चिम विभाग