आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेत लखलखाट, तिजाेरीला सहामाही तब्बल २५ लाखांचा शाॅक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘साैरऊर्जेचा वापर करा घरपट्टीत सवलत मिळवा’ असा डंका पिटणारी नाशिक महापालिका अार्थिक खडखडाट असताना, ‘लाेका सांगे ब्रह्मज्ञान, अापण मात्र काेरडे पाषाण’ या उक्तीप्रमाणे कशी दिवाळखाेरी करीत अाहे, यावर धक्कादायकरीत्या प्रकाश पडला अाहे. महापालिका मुख्यालय महापाैरांच्या निवासस्थानावर सहा महिन्यांत सरासरी २५ लाख रुपये निव्वळ विजेवर खर्च हाेत असल्याचे समाेर अाले अाहे. एवढेच नव्हे, तर पालिकेत तब्बल ८७ एअर कंडीशनर गारेगार हवा फेकत असून, महिन्याचे सरासरी बिल चार लाख रुपये असल्यामुळे अाता या उधळपट्टीला सत्ताधारी मनसे कसा चाप लावते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले अाहे.

अाम अादमी पक्षाचे कार्यकर्ते जसबीर सिंग यांनी महापालिकेतील विजेच्या या लखलखाटावर हाेणाऱ्या खर्चाची माहिती मागितली असता, माहितीच्या अधिकारात हा धक्कादायक प्रकार उघड झाला. स्मार्ट सिटीच्यादृष्टीने वाटचाल करणाऱ्या नाशिक महापालिकेला अार्थिक खडखडाटाच्या माेठ्या समस्येचा सध्या सामना करावा लागत अाहे.

नाशिक महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी उत्पन्नातील गळती नवीन उत्पन्नाचे स्रोत शाेधण्यासाठी थेट नागरिकांच्या काेर्टात चेंडू टाेलवला अाहे. अार्थिक परिस्थिती नाजूक असताना महापालिकेकडून एक अाणि एक रुपया बचत करणे अपेक्षित अाहे. प्रत्यक्षात महापालिकेकडून त्यादृष्टीने काेणतीही पावले उचलली जात नसल्याचे खेदजनक चित्र समाेर उर्वरित.पान
पालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता दिवे, पंखे सुरूच हाेते.

‘रामायण’वरील एसी वापरतेय कोण?
महापाैर अशाेक मुर्तडक यांचा बराचसा कालावधी शहरातील दाैरे, कार्यक्रमांमध्ये जात असताे. बैठका नागरिकांच्या भेटीसाठी बऱ्याच वेळा ते मुख्यालयातील महापाैर दालनात उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या अनुपस्थितीत ‘रामायण’ निवासस्थानाचे सरासरी १३ हजारांपर्यंत वीजबिल कसे जाते, असा प्रश्न निर्माण झाला अाहे. ‘रामायण’ या निवासस्थानी चार एसी असून, त्यांच्या अनुपस्थितीत त्याचा वापर काेणी करते का, येथे ऊर्जा गळती अाहे का, याचा शाेध घेण्याची बाब गरजेची झाली अाहे.

असे अाहे पालिकेचे वीजबिल
महापालिका मुख्यालय महापाैरांचे निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्याचे विजेचे बील दरमहा सरासरी लाख १४ हजार रुपये इतके येते तर सहा महिन्यांत एकूण बील तब्बल २४ लाख ८५ हजार ८४० रुपये इतके आल्याचे उघड झाले आहे.