आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणुकीपूर्वीच ‘अाॅनलाइन’ मतदानाचा फंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीचे पडघम जाेरात वाजू लागले असून, सर्वपक्षीय इच्छुकांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवायला अाणि डावपेच खेळायला प्रारंभ केला अाहे. या अभिनव अायडियांना साेशल मीडियाच्या माध्यमातून अाकार देत निवडणुकीच्या सहा महिने अाधीच ‘अाॅनलाइन’ निवडणुका लढवून अापल्यालाच मतदान करण्याचे अावाहन करीत ही ‘माेबाइल निवडणूक’ प्रचारासह जिंकण्यासाठी एसएमएसचा भडिमार केला जात अाहे.
एकाहून एक सरस ‘अायडिया’ लढवत इच्छुक अापणच कसे निवडून येणार अाहे, त्याचे दावे अातापासूनच करू लागले अाहेत. त्यासाठी ‘व्हाेट पाेलकाेड डाॅट काॅम’सारख्या वेबसाइटच्या लिंक पाठवून विविध प्रभागांमधील सर्व इच्छुकांची नावे देऊन त्यातील काेणता उमेदवार निवडून येणार, अशी विचारणा केली जाते. या लिंकमध्ये प्रभागाचा क्रमांक, सर्वपक्षीय इच्छुकांची नावेही दिली जात अाहेत. त्यातून मतदाराने एक उमेदवार निवडण्याचे अावाहन केले अाहे. या लिंकवर किती लाेकांनी भेट दिली, किती जणांनी मतदान केले त्याबाबतचे अाकडेही येत अाहेत.
प्रभागातील ‘उमेदवारां’ची यादी अशा प्रकारे पाठवली जात अाहे.

पक्षांनी जाहीर करण्यापूर्वीच उमेदवारी
काेणत्याही पक्षाने अद्याप काेणतेच धाेरण, अाघाडी किंवा उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र, हे उतावीळ इच्छुक अापल्यालाच पक्षाने जणू काही उमेदवारी दिली असल्याचा दावा करून त्यानुसार मतदान करण्यासाठी मतदारांकडे माेबाइलवर संदेश पाठवत कॅम्पेनिंगही करत अाहेत. काेणत्याही इच्छुकाशी निष्ठा बांधलेले मतदार मात्र या साऱ्या प्रकारामुळे गाेंधळात पडल्याचे चित्र अाहे. यापुढे अाणखी असेच फंडे अवलंबले जाणेही शक्य अाहे.

यांच्यापैकी काेणता ‘सेवक’ चालेल...
‘अापल्या प्रभागाच्या विकासासाठी तुम्हाला काेण सेवक चालेल’, असा सवाल करीत संबंधित सर्व उमेदवारांची नावे अाणि त्यापुढे पक्षही देण्यात अाले अाहेत. अर्थात, त्यात काेणत्या अारक्षणावर काेण उभे राहणार याबाबतची माहिती उपलब्ध नाही. प्रभागातील नागरिकांचा कल चाचपण्याच्या दृष्टीने ही खेळी खेळण्यात येत असली तरी प्रत्येक उमेदवार अापल्या समर्थकांना या खेळात भाग घेण्यासाठी उद्युक्त करत असल्याचे दिसून येत अाहे.
बातम्या आणखी आहेत...