आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवख्यांना रोखण्यासाठी परिसीमा,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पालिकानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अाता सर्वत्र रणकंदन सुरू झाले असून, विराेधी पक्षाच्या इच्छुकांना काेंडीत धरण्याबराेबरच स्वपक्षीयांवरही अंतर्गत कुरघाेडी करणे सुरू झाले अाहे. काेजागरी पाैर्णिमेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या काही कार्यक्रमांतही शहरात ही अनुभूती अाली. ‘सिनीयारिटी’चा निकष समाेर ठेवत नवाेदितांनी कार्यक्रम घेऊच नये, अशी ‘फिल्डिंग’ काहींनी लावली हाेती. त्यामुळे एेनवेळेला अालेले हे विघ्न दूर करण्यासाठी संबंधिताला जिवाचे रान करावे लागले.
महापालिकेच्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे यावेळी निवडणुकीत इच्छुकांची संख्या कमालीची वाढणार अाहे. त्यादृष्टीने अाता हालचालीही सुरू झाल्या अाहेत. पॅनलमध्ये जुने अाणि नवे असा मेळ घालण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असणे अपेक्षित अाहे. प्रत्यक्षात मात्र सत्ताप्राप्तीसाठी दिग्गजांभाेवतीच दिवे अाेवाळले जात असून, नवख्यांकडे दुर्लक्ष केले जात अाहे. जुन्यांकडूनही त्यास खतपाणी घातले जात अाहे. इतकेच नाही तर नवख्यांचे पत्ते कट करण्यासाठीही काही मंडळी प्रयत्नशील असल्याचे पुढे येते. यापूर्वी पक्षीय कामे प्रामाणिकपणे करणारे अाणि त्या माध्यमातून जनसंपर्क वाढणाऱ्यांना निवडणूक लढण्याचे ‘डाेहाळे लागणे’ स्वाभाविक अाहे. परंतु, त्यामुळे जुन्यांच्या पाेटात गाेळे येत अाहेत. पदे अाणि उमेदवाऱ्या केवळ अापल्याच कुटुंबीयांत वाटल्या जाव्यात यासाठी ही मंडळी कार्यरत असल्याचे यंदाच्या निवडणुकीतूनही दिसून येत अाहे. वास्तविक, कार्यकर्त्यांना माेठे करणाऱ्या नेत्याला माेठा जनाधार लाभताे. शिवाय, त्यातून कार्यकर्त्यांचा नेत्याप्रति त्या अनुषंगाने पक्षाप्रतिचा विश्वास वाढून त्यातून राजकीय संघटनही वाढीस लागते. मात्र, याचा विचार करताच एका - एका कुटुंबातून दाेन ते तीन उमेदवाऱ्यांवर दावा केला जात अाहे. त्यातून नव्यांना संधी द्यायचीच नाही, असे मनसुबे रचल्याचे दिसून येत अाहे. काेजागरीनिमित्त अायाेजित केलेल्या कार्यक्रमात या सर्व बाबींची अनुभूती येत अाहे.

शहरात झालेल्या एका कार्यक्रमात याची प्रचिती अाली. एका नवाेदित इच्छुकाने काेजागरीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे अायाेजन केले हाेते. परंतु, हा कार्यक्रम हाेणार कसा नाही, याचसाठी संबंधित वरिष्ठाने युद्धपातळीवर प्रयत्न केल्याचे दिसते. इतकेच नाही तर कार्यक्रमासाठी मैदान मिळू नये, हाेर्डिंगला परवानग्या मिळू नये, अशाप्रकारची व्यवस्था करण्यात अाली अाली हाेती. शिवाय, संबंधिताला धारेवर धरताना त्याच्यावर शिवराळ भाषेत अागपाखडही करण्यात अाली. ‘तुम्हाला उमेदवारी कशी मिळते तेच बघू’ असा गर्भित इशाराही देण्यात अाला. मात्र, याच पक्षातील अन्य लाेकप्रतिनिधी संबंधिताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याने या नवाेदिताचा कार्यक्रम अखेर पार पडला.

महापालिकेच्या अागामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून जाेरदार माेर्चेबांधणी सुरू झाली अाहे. यातूनच इच्छुकांमध्ये जाेरदार रस्सीखेच सुरू असून, पक्षांतर्गत स्पर्धेत नवख्यांना राेखण्यासाठी पक्षातील दिग्गजांकडून अशाप्रकारे विविध चाली खेळल्या जात अाहेत.

कार्यकर्त्यांनी पुढे जाऊच नये का?
एकाच कुटुंबातील मुलगा, मुलगी, दीर, वहिनी अशांना उमेदवारी देण्यासाठी काही मंडळी प्रयत्नशील अाहेत. त्यामुळे कार्यकर्ता वर्ग मात्र नाराज अाहे. अाम्ही केवळ झेंडेच लावायचे का, कष्टच उपसायचे का, अाम्ही उमेदवारी करूच नये का, असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात अाहेत.
बातम्या आणखी आहेत...