आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारक्षणाची फुटणार हंडी, काेणाची उडणार दांडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातमहिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीतील ३१ प्रभागांकरिता १२२ जागांसाठी शुक्रवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात अारक्षण साेडत जाहीर हाेणार असून, त्यात विद्यमान नगरसेवकांपैकी काेणाची दांडी उडणार काेण रिंगणात राहणार, हे बघणे रंजक ठरणार अाहे.
महापालिका निवडणूक मार्च २०१७ मध्ये हाेत असून, यंदा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे ६१ एेवजी ३१ प्रभाग हाेणार अाहेत. यापूर्वी ६१ प्रभागात प्रत्येकी दाेन याप्रमाणे १२२ सदस्य हाेते. अाता ३१ प्रभाग मिळून १२२ सदस्य राहणार अाहेत. त्यात एका प्रभागात चार सदस्य राहणार असून, प्रत्येक प्रभागात ‘अ’, ‘ब’, ‘क’ ‘ड’ अशा जागा करून त्यावर अारक्षण टाकले जाणार अाहे. साेडतीची ही प्रक्रिया जवळपास अडीच तास चालणार असून, अारक्षणानुसार जागा लक्षात येण्यासाठी नागरिकांना संबंधित प्रभागाचे नकाशेही उपलब्ध करून दिले जाणार अाहेत.

दरम्यान, नकाशामुळे नगरसेवकांना संभाव्य प्रभागाचे स्वरूपही स्पष्ट हाेणार असल्यामुळे शुक्रवारच्या साेडतीला ताेबा गर्दी हाेण्याची शक्यता अाहे. साेडतीतील अारक्षणावर नगरसेवकांचे भवितव्य असून, अापला पत्ता कट हाेताे का, यापासून नव्याने प्रभाग रचनेत काेणता भाग मिळताे, ताे अनुकूल की प्रतिकूल या विचारातून नगरसेवकांची धडधड वाढली अाहे.
अशीअसेल व्यवस्था : कलामंदिरातअखेरच्या प्रेक्षकाला दिसेल अशा पद्धतीने साेडत काढली जाईल. या ठिकाणी दाेन स्क्रीन लावल्या जाणार असून, बाहेर पॅसेजमध्ये खुर्च्या स्क्रीनची व्यवस्था असेल. अशा पद्धतीने कालिदाससमाेरील मैदानातही मंडप स्क्रीन असेल.
अशीनिघेल साेडत : प्रथमअनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग, महिलांसाठी राखीव जागांसाठी साेडत हाेणार अाहे. त्यात नागरिकांना प्रभागाचा स्वतंत्र नकाशा,तसेच प्राेजेक्टरद्वारे काेणती जागा अारक्षित झाली याची माहिती ठसठशीतरित्या दाखवली जाणार अाहे. अनुसूचित जातीसाठी लाेकसंख्येच्या उतरत्या क्रमाने अारक्षण निघेल. अनुसूचित जातीच्या १८ जागांपैकी जागा महिलांसाठी चिठ्ठी पद्धतीने अारक्षित हाेतील. याच पद्धतीने अनुसूचित जमातीच्या जागापैकी महिलांसाठी राखीव हाेतील. अाेबीसीच्या ३३ जागा असून प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे ३१ जागांची निश्चिती हाेईल. त्यानंतर उर्वरित दाेन जागा ज्या प्रभागात किमान तीन जागा राखीव नाही, तेथे चिठ्ठीद्वारे अारक्षित केल्या जातील.

एकाच पक्षातील नगरसेवक येणार अामनेसामने
एक सदस्यीय वा द्विसदस्यीय प्रभागरचनेत एका वा दाेन्ही जागांवर राखीव प्रवर्गाचे अारक्षण पडल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांचा पत्ता कट हाेत हाेता. मात्र, चार सदस्यीय प्रभागरचनेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान एक जागा राहणार असल्यामुळे याच जागेवरून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची माेठी भाऊगर्दी हाेईल, असे चित्र अाहे. परिणामी, एकाच पक्षातील विद्यमान नगरसेवक अामनेसामने येऊ शकतील. या स्थितीत राजकीय पक्षांची माेठी कसरत हाेणार अाहे. दुसरीकडे, एकाच जागेवर उमेदवारांची भाऊगर्दी जमल्यास मतदान यंत्रात त्या दृष्टीने संभाव्य फेरबदल करण्यावरून निवडणूक यंत्रणेची कसाेटी लागणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...