आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजपमध्येच हाेणार लढत, मनसेवर उमेदवार शाेधण्याची वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजप- शिवसेनेतच इच्छुकांची सर्वाधिक संख्या असल्याने या पक्षांतच लढतीची चिन्हे अाहेत. गेल्या निवडणुकीत मनसेचे शशीकांत जाधव, सलीम शेख, उषा शेळके सुरेखा नागरे निवडून अाले हाेेते. त्यातील जाधव, नागरे शेळके यांनी पक्षांतर केल्याने अाणि शेख यांनी शेजारील प्रभागातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने मनसेवर उमेदवार शाेधण्याची वेळ अाली अाहे. हीच स्थिती काँग्रेस-राष्ट्रवादीची अाहे. 

प्रभागात पिंपळगाव बहुला, जाधव संकुल, संभाजीनगर, सावरकरनगर, विश्वासनगर, श्रीकृष्णनगर, वास्तुनगर, अशोकनगर, विवेकानंदनगर, राज्य सहकारी कर्मचारी वसाहत या परिसराचा समावेश अाहे. विद्यमान नगरसेवकांपैकी जाधव यांनी भाजप, तर नागरे शेळके यांनी शिवबंधन बांधले अाहे. त्यामुळे भाजप-सेनेतील इच्छुकांची यादी वाढतच चालली अाहे. सलीम शेख यांनी प्रभाग ११ मधून तयारी चालविली अाहे. प्रभाग १० मधील अाेबीसी महिला जागेवर त्यांच्या पत्नी फरीदा शेख उभ्या राहण्याची शक्यता अाहे. विद्यमान नगरसेवकांसह शिवसेनेकडून धीरज शेळके, लाेकेश गवळी, राजू नागरे, संदीप पवार, शांताराम कुटे, सुरेखा नागरे तर भाजपकडून सुदाम नागरे, रेखा जाधव, समाधान देवरे, माधुरी बाेलकर, राजेंद्र चिखले, पल्लवी पाटील, सारिका दराडे इच्छुक अाहेत. 
 
बंडखाेरीची सर्वाधिक शक्यता 
प्रभाग क्रमांक १० च्या निवडणुकीत शिवसेना भाजप यांच्यातील इच्छुकांची संख्या माेठी असल्याने उमेदवारी नाकारल्या गेलेल्या उमेदवारांकडून बंडखाेरी हाेण्याची सर्वाधिक शक्यता अाहे. या बंडखाेर उमेदवारांना एेनवेळी मनसे, काँग्रेस राष्ट्रवादी गळाला लावण्याची शक्यता अाहे. 

माकप लढविणार चारही जागा 
प्रभागातभाजप-सेनेत रस्सीखेच असली तरी या पक्षांच्या उमेदवारांसमाेर माकपचे माेठे अाव्हान असणार अाहे. माकपच्या वतीने सीताराम ठाेंबरे भिवाजी भावले या दाेन जणांची उमेदवारी निश्चित करण्यात अाली अाहे. त्यांनी प्रचाराची एकफेरी देखील पूर्ण केली असून उर्वरित दाेन जागांसाठी लवकरच दाेन उमेदवारांची घाेषणा करण्यात येणार अाहे.