आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६१२ गुन्हेगारांवर करणार कारवाई, महापालिका निवडणूक काळात गुन्हेगारांवर पाेलिस यंत्रणेचा ‘वॉच’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नाशिक - नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. शहरातील ६१२ सराईत गुन्हेगारांचे वर्गीकरण करण्यात येऊन त्यांची धरपकड करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये झोपडपट्टी दादा प्रतिबंधक (एमपीडीए) आणि संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस निवडणुकीच्या पूर्वी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह राजकीय पक्षामध्ये सक्रिय गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. 

निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे. 

या आदेशान्वये गुन्हे शाखेने शहरातील १६६ संशयित गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली. १२२ सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. एक दोन गुन्हे दाखल असलेल्या संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक सीआरपीसी १४९ अन्वये २५१ संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक (एमपीडीए) अंतर्गत तर संघटित गुन्हेगारी प्रतिबंध (मोक्का) अन्वये टोळ्यांवर कारवाई सुरू आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीची मिटिंग बोलावत १३ पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील संशयितांसह सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार १३ पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यातील संशयित गुुन्हेगारांसक सराईत गुन्हेगारांचे वर्गीकरण करण्यात आले. यानुसार ६१२ गुन्हेगारांसह एक दोन गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. 

विशेष पथक राहणार तैनात : निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याचा एक कर्मचारी या पथकात सहभागी राहणार आहे. पथक परिसरात गोपनीय माहिती घेऊन संशयितांवर कारवाई करेल. राजकीय नेत्यांचा सहभाग असल्यास नेत्यांवर कारवाईचे आदेश पथकाला देण्यात आले आहे. 

अशी झाली कारवाई : प्रतिबंधक- १६६, सराईत गुन्हेगार - १२२, मुंबई पोलिस कायदा अंतर्गत - ३८, गंभीर गुन्हे दाखल - ३०, एक दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल - २५१, तर एकापेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यात सहभाग - गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. 

एमपीडीए कारवाई : झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कारवाईमध्ये उपनगर - २, पंचवटी - २, अंबड - अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र संघटित गुुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) - कारवाई प्रस्तावित आहेत. 

गुन्हेगारांची गय केली जाणार नाही 
महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हेगारांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई सुरू आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. राजकीय गुन्हेगारांसह सराईत गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा - डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त.