आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिका प्रभागरचना अडचणीत, जिल्हा दिवाणी न्यायालयात 9 डिसेंबर राेजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीची ३१ प्रभागांची अंतिम रचना नुकतीच जाहीर झाली असताना, या प्रक्रियेत राज्य निवडणूक अायाेगाच्या निर्देशाचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने गुगल मॅपवर प्रगणक गटाची रचना झाल्याचा दावा जिल्हा दिवाणी न्यायालयात दाखल झाला अाहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी राज्य निवडणूक अायाेगासह विभागीय अायुक्त, महापालिका अायुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिवादी करून डिसेंबर राेजी म्हणणे मांडण्याचे अादेश दिल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगीत दिली.

महापालिकेची निवडणूक साधारण फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित असून, या निवडणुकीसाठी १० अाॅक्टाेबर राेजी प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली हाेती. २५ अाॅक्टाेबरपर्यंत प्रारूप प्रभागरचनेवर हरकती सूचना मागवण्यात अाल्या हाेत्या. या कालावधीत विविध प्रकारच्या ३२ हरकती अाल्या हाेत्या. हरकती सूचनांवर पालिकेचा अभिप्राय घेऊन प्रधान सचिव दीपक कपूर यांनी राज्य निवडणूक अायाेगाकडे अहवाल पाठवला हाेता. त्यानंतर राज्य निवडणूक अायाेगाने हरकती अमान्य करून २५ नाेव्हेंबर राेजी अंतिम प्रभागरचना जाहीर केली. निवडणूक अायाेगाकडून दाद मिळाल्यामुळे हरकतदार हर्षल जाधव यांनी जिल्हा दिवाणी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, न्यायाधीश श्रीमती ए. एच. काशीकर यांच्यासमाेर जाधव यांच्या वतीने अॅड. नागनाथ गाेरवाडकर यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार राज्य निवडणूक अायाेगासह तिन्ही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना प्रतिवादी करीत डिसेंबर राेजी अापली बाजू मांडण्यासाठी पाचारण केले अाहे.

काय अाहेत अाक्षेप? : जाधवयांनी दाखल केलेल्या दाव्यानुसार, प्रभागरचना जाहीर करताना गुगल मॅपवर ठळकपणे प्रगणक गट दिसलेच पाहिजे, अशा खुद्द निवडणूक अायाेगाच्या अादेशाचे महापालिकेने पालन केलेले नाही. त्यामुळे गुगल मॅपद्वारे प्रभागरचना स्पष्ट हाेत नसल्याचा प्रमुख अाक्षेप अाहे.
निवडणूक कार्यक्रमही अडचणीत
न्यायालयाने परिस्थिती जैसे थे (स्टेटस्काे) ठेवण्याचे अादेश दिल्यामुळे राज्य निवडणूक अायाेगाला महापालिकेशी संबंधित निवडणूक कार्यक्रम जाहीर करता येणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले. मात्र, त्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळाले नाही. महापालिकेचे उपायुक्त विजय पगार यांनी न्यायालयाचे अादेश प्राप्त झाल्याचे सांगितले. तर, महापालिकेचे वकील अॅड. सुधीर काेतवाल यांनी मंगळवारी न्यायालयाचे अादेश बघून बाेलता येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, राज्य निवडणूक अायाेगाने २० अाॅगस्ट २०१६ राेजीच महापालिकेला पत्र पाठवून प्रभागरचनेत सर्व निर्देशांचे पालन हाेते की नाही, याची खातरजमा करण्याबाबतही सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. अाता न्यायालयाच्या पुढील अादेशाकडे लक्ष लागले अाहे.
बातम्या आणखी आहेत...